RR Vs DC Live Streaming (फोटो- ट्विटर)
दिल्ली कॅपिटल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय
वैभव सूर्यवंशीची शानदार खेळी
रियान परागची अर्धशतकी खेळी
Tata IPL 2026 DC Vs RR Live Updates: सध्या दिल्लीच्या अरुण जेटलीच्या क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी (IPL 2026) करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशीने शानदार खेळी केली. राजस्थानकडून वैभव सूर्यवंशी, रियान पराग आणि ध्रुव जुरेलने जबरदस्त खेळी केली. अखेर या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला 194 रन्सचे टार्गेट दिले आहे.
राजस्थान रॉयल्सची फलंदाजी
राजस्थान रॉयल्सकडून सलामीला खेळण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी मैदानात उतरले. यशस्वी जयस्वाल आज देखील चांगली खेळी करू शकला नाही. यशस्वी जयस्वाल 12 रन्स करून आउट झाला. तर वैभव सूर्यवंशीने शानदार आक्रमक खेळी केली आहे. पॉवर प्लेमध्ये त्याने राजस्थानला चांगली सुरुवात करून दिली. वैभव सूर्यवंशी 46 रन्स करून आउट झाला. रियान परागने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. तो 51 रन्स करून आउट झाला. रवी सिंग 4 रन्स करून आउट झाला. शुभम दुबेने केवळ 5 रन्स केल्या. धरू जुरेलने देखील शानदार अर्धशतक लगावले. दसुन शनाकाने 10 रन्सची खेळी केली.
DC Vs RR Live: अक्षर पटेलने जिंकला टॉस; राजस्थानविरुद्ध प्रथम करणार गोलंदाजी
Back in action and back among the runs 💪#RR captain Riyan Parag with his 2⃣nd fifty this season 🩷 Updates ▶️ https://t.co/JwHkQQ1ayi #TATAIPL | #KhelBindaas | #DCvRR pic.twitter.com/9wKyQlqmAz — IndianPremierLeague (@IPL) May 17, 2026
दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी
दिल्ली कॅपिटल्सने पॉवर प्लेमध्ये एकच विकेट मिळवण्यात यश आले. पॉवर प्लेमध्ये त्यांनी आक्रमक खेळी करण्यासाठी प्रसिड असलेल्या यशस्वी जयस्वालला लुंगी एनगिडीने आउट केले. तर 46 रन्सवर असणाऱ्या वैभव सूर्यवंशीला माधव तिवारी या पहिलाच सामना खेळत असलेल्या नवख्या गोलंदाजाने आउट केले. मिशेल स्टार्कने कर्णधार रियान पराग आणि फेरेराची विकेट पटकावली. तसेच मिशेल स्टार्कने रवी सिंगला आउट केले. माधव तिवारीने शुभम दुबेला आउट केले.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ: के.एल. राहुल (यष्टिरक्षक), पाथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, काइल जेमीसन / लुंगी एंगिडी, टी. नटराजन / मुकेश कुमार.
RCB vs PBKS : ‘किंग’ Kohli चा नवा रेकॉर्ड, ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
राजस्थान रॉयल्सचा संघ: यशस्वी जयस्वाल, रविंद्र जडेजा, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, वैभव सूर्यवंशी, शिमरन हेटमायर, डोनोवन फरेरा, शुभम दुबे, यश राज, ब्रिजेश शर्मा, संदीप शर्मा






