मुंबई इंडियन्सला मोठा धक्का (फोटो- सोशल मिडिया)
मिशेल सँटनर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
मुंबई इंडियन्सच्या अडचणीत मोठी वाढ
मुंबई पलटणचा उद्या एसआरएच विरुद्ध सामना
Mumbai Indians: सध्या आयपीएलचा महासंग्राम सुरू आहे. या हंगामात 5 वेळेस विजेतेपद पटकावणारे संघ सध्या विजयासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. मुंबई इंडियन्स सध्या पॉईंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी आहे. उद्या मुंबई इंडियन्सचा संघ एसआरएच विरुद्ध खेळणार आहे. मात्र सामना होण्याआधीच मुंबईच्या संघाला मोठा धक्का बसला आहे.
मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पंड्या करत आहे. मात्र या हंगामात मुंबई इंडियन्स केवळ 2 सामने जिंकू शकली आहे. पूर्ण संघाची कामगिरी एकूण फारशी साजेशी राहिलेली नाहीये. त्यातच आता संघाला एक मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघातून एक खेळाडू पूर्ण स्पर्धेसाठी बाहेर पडला आहे. मिशेल सँटनरला दुखापत झाल्यामुळे तो पूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
केशव महाराजची संघात एन्ट्री
सँटनर बाहेर पडल्यानंतर मुंबई इंडियन्सने बदली खेळाडूची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फिरकीपटू केशव महाराज मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सामील होणार आहे. केशव महाराजकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव असून फिकरीपटू आहे. त्यामुळे केशव महाराजच्या येण्याने मुंबई इंडियन्सची ताकद वाढणार असल्याचे म्हटले जात आहे.






