वैभव सूर्यवंशी (फोटो- ट्विटर)
वैभव सूर्यवंशीने यंदाच्या हंगामात केलीये तूफान फटकेबाजी
जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच बॉलवर लगावलेला सिक्स
43 रन्स करताच आणखी एक रेकॉर्ड होणार नावावर
Vaibhav Suryvanshi At IPL 2026: वैभव सूर्यवंशी या 15 वर्षीय तरुणाने यंदाचा आयपीएल हंगाम गाजवला आहे. वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. सलामीला खेळण्यासाठी येऊन वैभव सूर्यवंशी तूफान फटकेबाजी करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. वैभव सूर्यवंशी आता इतिहासाच्या उंबरठ्यावर उभा असून, आगामी (IPL 2026) सामन्यात केवळ ४३ धावा करताच तो आयपीएलच्या इतिहासात एक मोठा पराक्रम करणार आहे.
येत्या पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीने केवळ 43 रन्स केल्या, तर तो एकाच आयपीएलच्या हंगामात 230 च्या कदाचित यापेक्षा जास्तीच्या स्ट्राईक रेटने 400 रन्स पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज ठरणार आहे. अवघ्या 16 व्या वर्षी जागतिक स्तरावरील गोलंदाजांचा समाचार घेत अशा स्ट्राईक रेटने रन्स करणे , ही क्रिकेटमधली एक चांगली गोष्ट समजली जात आहे.
यंदाच्या हंगामात वैभव सूर्यवंशीने तडाखेबंड खेळी केली आहे. त्याने आतापर्यंत 357 रन्स केल्या आहेत. त्याने 234.87 च्या स्ट्राईक रेट या रन्स केल्या आहेत. केवळ 15 वर्षीय असणाऱ्या वैभव सूर्यवंशीने सर्वांना चकित केले आहे. कमी चेंडूत शतक लगावण्याचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे.
RR Vs PBKS Live: रियान परागने जिंकला टॉस; पीच रिपोर्टचा विचार करून घेतला ‘हा’ निर्णय
आयपीएलमध्ये आज टॉप 4 मध्ये असणाऱ्या संघांमध्ये सामना होणार आहे. पंजाब किंग्ज तर 1 ल्या स्थानी तर राजस्थान रॉयल्स चौथ्या स्थानी आहे. त्यामुळे आजचा सामना रोमांचक पाहायला मिळण्याची शक्यता आहे.संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. आज वैभव सूर्यवंशी आणि प्रियांश आर्या यांच्या खेळीकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे. या खेळपट्टीवर फलंदाजांसाठी फायदा असला तरी देखील, सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये गोलंदाजांना या ठिकाणी मदत मिळू शकते.
IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशी Vs प्रियांश आर्या भिडणार! प्लेऑफ साठी PBKS Vs RR आज थेट…
हेड टू हेड रेकॉर्ड काय सांगतो?
आज पंजाब किंग्ज अन् राजस्थान रॉयल्समध्ये सामना होणार आहे. पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सचे संघ 2008 पासून आतापर्यंत एकूण 30 वेळेस आमनेसामने आले आहेत. तर यामध्ये राजस्थान रॉयल्सने आतापर्यंत 17 तर आणि पंजाब किंग्जने 13 सामने जिंकले आहेत. त्यामुळे राजस्थान रॉयल्सचा संघ मजबूत दिसून येत आहे.
काय आहे पीच रिपोर्ट?
चंदीगडची खेळपट्टी यंदाच्या हंगामात फलंदाजांसाठी अत्यंत पूरक ठरली आहे. 2026 च्या आयपीएलमध्ये या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 211 इतकी आहे. खेळपट्टीवर चांगला बाऊन्स आणि वेग असल्याने चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो. ज्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे जाते. आजच्या सामन्यातही 180 ते 200 पेक्षा जास्त रन्सचा डोंगर उभा राहण्याची शक्यता आहे.






