वैभव सूर्यवंशी (फोटो- ians)
आजच्या सामन्यात देखील सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीवर असणार आहे. मागच्या सामन्यात त्याने शानदार अर्धशतकी खेळी केली आहे. आता वैभव सूर्यवंशीबाबत भारतीय संघाचे कार्यवाहक बॉलिंग कोच सुनील जोशी यांनी वैभवच्या भविष्याबबत प्रतिक्रिया दिली आहे. मागील सामन्यात वैभव सूर्यवंशीने शानदार खेळी करत त्याच्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर दिले आहे.
धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?
सुनील जोशी सध्या झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघाचे कार्यवाहक बॉलिंग कोच म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना पत्रकार परिषदेत वैभवच्या भविष्यातील प्लॅन्सबद्दल विचारण्यात आले. आता सध्या वैभव सूर्यवंशीकडे केवळ एक फलंदाज म्हणून पाहिले गेले पाहिजे. मला आनंद आहे की पहिल्या सामन्यात त्याने जबरदस्त फॉर्म दाखवला आणि पुढील दोन्ही सामन्यात तो तसेच करेल. त्याने अंडर -19 मध्ये देखील चांगली कामगिरी या ठिकाणी केली होती. जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा आम्ही त्याच्यासोबत गोलंदाजीवर काम करू, असे सुनील जोशी म्हणाले.
इंटरनॅशनल क्रिकेट आणि आयपीएलमध्ये वैभव सूर्यवंशीने शानदार फलंदाजी केली आहे. लहान वयात त्याने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. मात्र त्याला अद्याप गोलंदाजी करताना पाहण्यात आले नव्हते. मात्र त्याने फारस्ट क्लास क्रिकेट आणि अंडर 19 मध्ये गोलंदाजी केली आहे. त्यामुळे भविष्यात वैभव सूर्यवंशी भारतीय संघासाठी एक पार्ट टाइम गोलंदाज म्हणून खेळू शकतो.
IND vs ZIM: पुन्हा येणार आज वादळ! वैभव सूर्यवंशी करणार कमाल? बिहारी बाबू उडवणार गर्दा
काय म्हणाला कर्णधार श्रेयस अय्यर?
वैभव सूर्यवंशीची फलंदाजी अत्यंत चांगली होती. तो निर्भयपणे खेळतो. ज्या प्रकारे त्याने अर्धशतकी खेळी केली, ती एकदम कौतुकास्पद आहे. वैभव याआधी देखील या ठिकाणी खेळला आहे. त्यामुळे येथील विकेटची चांगली माहिती होती. अंडर-19 फायनलमध्ये त्याने 175 रन्सची खेळी गेली होती. आज त्याला चांगल्या प्रकारे खेळताना पाहून आनंद झाला. सिरिजची सुरुवात चांगली झाली आहे.






