भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 सिरिज (फोटो- सोशल मीडिया)
आयसीसी टी 20 वर्ल्डकप यंदा भारताने जिंकला आहे. त्यावेळेस सूर्यकुमार यादव भारताचा कर्णधार होता. मात्र आता त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेऊन श्रेयस अय्यरला जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र त्याच्या नेतृत्वात आयर्लंडकडून भारताचा पराभव झाला. अय्यर गेले तीन वर्ष एकही इंटरनॅशनल टी 20 सामना खेळला नव्हता. त्याचाच फटका भारतीय संघाला बसल्याचे पाहायला मिळाले.
श्रेयस अय्यरची अग्निपरीक्षा
आयर्लंडविरुद्धच्या २-० अशा मानहानीकारक पराभवानंतर आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासमोर इंग्लंडचे सर्वात मोठे आव्हान आहे. आजच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यास कर्णधार श्रेयस अय्यरच्या नावावर एक लाजिरवाणा रेकॉर्ड नोंदवला जाणार आहे. भारतीय संघाने 2021 मध्ये सलग तीन टी 20 सामने गमावले होते. त्यानंतर भारताचा आशा पद्धतीने कधीच पराभव झाला नव्हता. मात्र आयर्लंडविरुद्ध 2026 मध्ये भारताचा 2-0 ने पराभव झाला आहे. त्यातच आता आजचा सामना भारताने गमावला तर 2021 चा रेकॉर्डची पुनरावृत्ती होणार आहे. त्यामुळे आजचा सामना श्रेयस अय्यरसाठी कर्णधार म्हणून अत्यंत महत्वाचा असणार आहे.
IND Vs ENG Live: ‘या’ एका कारणामुळे रद्द होणार भारत-इंग्लंड सामना? धाकधूक वाढली, विषय काय?
आयर्लंडविरुद्ध पराभव झाल्याने मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधाराला ट्रोल केले जात आहे. भारत आयर्लंडविरुद्ध कधीच पराभूत झाला नव्हता. तो लाजिरवाणा विक्रम श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघाने आपल्या नावावर केला आहे. त्यातच वैभव सूर्यवंशीला अद्याप स्थान न दिल्याने देखील मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.
IND Vs ENG: वैभव सूर्यवंशीला न्याय मिळणार? श्रेयस अय्यरने एका वाक्यात संपवला विषय, म्हणाला…
या’ एका कारणामुळे रद्द होणार भारत-इंग्लंड सामना?
चेस्टर-ले-स्ट्रीट स्टेडियमवर आजचा भारत विरुद्ध इंग्लंड सामना होणार आहे. 5 टी 20 सामन्यांमधील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. दरम्यान सामना सुरू होण्याआधी या भागात 40 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर थोडा पाऊस कमी होऊ शकतो . मात्र रात्री 8 नंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.






