भारतीय संघाला मिळाला रविचंद्रन अश्विनचा रिप्लेसमेंट, रोहितने तनुष कोटियनला ऑस्ट्रेलियाला बोलावले तातडीने
Ravichandran Ashwin : रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेदरम्यान अचानक निवृत्ती घेतली. यानंतर मुंबईचा फिरकी अष्टपैलू तनुष कोटियनचा संघात समावेश होणार असल्याची बातमी समोर येत आहे. कोटियन सध्या सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळत आहे. कोटियन हा ऑफ-स्पिन गोलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज आहे.
रविचंद्रन अश्विनच्या जागी भक्कम फिरकी गोलंदाज
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीदरम्यान टीम इंडियामध्ये बदल झाल्याची बातमी आहे. फिरकी अष्टपैलू रविचंद्रन अश्विनच्या जागी मुंबईचा भक्कम फिरकी गोलंदाज अष्टपैलू तनुष कोटियनला मेलबर्न येथे भारतीय संघात सामील होण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. तो सध्या श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेत मुंबईकडून खेळत होता.
भारतीय संघात बदल करणे गरजेचे
स्पोर्टस्टारच्या वृत्तानुसार, कोटियन मंगळवारी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. कोटियन ऑफ-स्पिन गोलंदाजी करतो आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो. अहमदाबादमध्ये मुंबईच्या विजय हजारे ट्रॉफी संघासोबत होता. येथे हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की, रविचंद्रन अश्विनने अचानक निवृत्ती घेतल्याने भारतीय संघाला संघात बदल करणे भाग पडले आहे.
डोमेस्टीक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळाडू
गेल्या आठवड्यात गब्बा कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर निवृत्त झालेल्या आर अश्विनच्या जागी २६ वर्षीय तनुष कोटियन संघात सामील होणार आहे. कोटियन हा भारतीय देशांतर्गत सर्किटमधील सर्वोत्तम ऑफ-स्पिनिंग अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. यापूर्वी तो बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाचा भाग होता.
तनुष कोटियनची कारकीर्द
मुंबईच्या तनुष कोटियनची प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्द आतापर्यंत जबरदस्त राहिली आहे. त्याने 33 सामन्यात 101 विकेट घेतल्या आहेत. कोटियनने आतापर्यंत फलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे. त्याने 2 शतके आणि 13 अर्धशतकांसह 1525 धावा केल्या आहेत. तनुषने 20 लिस्ट ए मॅचेसमध्ये 20 विकेट आणि 90 धावा केल्या आहेत. 33 टी-20 मध्ये 6.39 च्या इकॉनॉमीने गोलंदाजी करताना त्याने 33 विकेट घेतल्या आणि 87 धावा केल्या.
आयपीएलचाही अनुभव
तनुष कोटियनने इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने २४ धावा केल्या. कोटियनला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. तनुष कोटियन मात्र आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात विकला गेला नाही.