वर्ल्ड कप सेमीफायनलपूर्वी टीम इंडियात बदल! (Photo Credit -X)
Shefali Verma has replaced Pratika Rawal in the Women’s World Cup. pic.twitter.com/7IOulZtCEf — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 27, 2025
भारतीय संघाने २६ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध आपला शेवटचा लीग सामना खेळला, जो पावसामुळे रद्द झाला. या सामन्यात बांगलादेशच्या डावातील २१व्या षटकादरम्यान दीप्ती शर्माच्या चेंडूवर शर्मिन अख्तरने मिडविकेटच्या दिशेने शॉट मारला. हा चेंडू अडवण्यासाठी प्रतिका रावल वेगाने डावीकडे धावली, पण तिचा पाय अचानक घसरला आणि तिला दुखापत झाली.
या दुखापतीनंतर ती प्रचंड वेदनेत दिसली आणि सपोर्ट स्टाफच्या मदतीने तिला मैदानाबाहेर घेऊन जावे लागले. आपल्या पहिल्याच वनडे वर्ल्ड कपमध्ये प्रतिका रावलने ७ सामन्यांत ३०८ धावा केल्या होत्या, ज्यात एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. तिचा हा शानदार फॉर्म पाहता, सेमीफायनलमधून बाहेर पडणे संघासाठी चिंतेची बाब आहे.
वनडे वर्ल्ड कप २०२५ साठी जेव्हा भारतीय महिला संघाची घोषणा झाली होती, तेव्हा शेफाली वर्माला ना मुख्य संघात, ना राखीव खेळाडूंच्या यादीत जागा मिळाली होती. आता प्रतिका रावलच्या जागी बदली खेळाडू म्हणून संघात सामील झालेल्या शेफालीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीत स्वतःला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे.
शेफालीने आपला अखेरचा वनडे सामना ऑक्टोबर २०२४ मध्ये खेळला होता. तिच्या वनडे कारकिर्दीत तिने २९ सामन्यांमध्ये २३ च्या सरासरीने ६४४ धावा केल्या आहेत, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. प्रतिका रावलच्या जागी सलामीला खेळण्याची संधी मिळाल्यास, शेफालीकडे टीम इंडियाला आक्रमक सुरुवात देऊन विश्वचषकाच्या फायनलमध्ये नेण्याची जबाबदारी असेल.






