सौजन्य - sachintendulkar ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून भारताच्या माजी दिग्गज खेळाडू WV Raman यांचा BCCI ला महत्त्वाचा सल्ला
The Former Legend Cricketer WV Raman Gave Important Advice to BCCI : भारत विरुद्ध न्यूझीलंड कसोटीमध्ये टीम इंडियाला क्लीन स्वीप मिळाली होती. यानंतर भारतीय संघावर चौफेर टीका झाली. या कसोटी मालिकेनंतर लगचेच आता बॉर्डर गावस्कर ट्रॉफी सुरू होणार आहे. येत्या 22 नोव्हेंबरपासून या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. परंतु, भारतीय संघाचा न्यूझीलंड विरुद्धचा फार्म बघता ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकणे आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशशिपमध्ये फायनल खेळणे यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.
भारतीय संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून सचिन तेंडुलकर
भारतीय संघाचे फलंदाज घरच्याच मैदानावर सपशेल अपयशी ठरले, त्यानंतर कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे टीम इंडियाची फलंदाजी सपशेल फेल ठरल्याने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता यावरून भारताच्या माजी खेळाडूने BCCI ला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. यामध्ये त्यांनी भारताचा मास्टर ब्लास्टरला भारतीय संघाचा फलंदाजी सल्लागार बनवण्यासंदर्भात सूचनावजा विनंतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडताहेत
भारतीय क्रिकेट संघाचे दोन वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली सध्या खराब फॉर्मशी झगडत आहेत. आता, ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू होण्याच्या काही दिवस आधी, माजी भारतीय क्रिकेटपटू डब्ल्यूव्ही रमण यांनी BCCI ला विराट-रोहितला खराब फॉर्ममधून बाहेर काढण्यासाठी सचिन तेंडुलकरची मदत घेण्याचा सल्ला दिला आहे. फिरकी गोलंदाजीसमोर 3 कसोटी सामन्यांमध्ये भारताच्या 37 विकेट पडल्यामुळे भारतीय फलंदाजीवर टीका झाली. तर रोहित आणि कोहली यांनी तीन कसोटी सामन्यांमध्ये अनुक्रमे 91 आणि 93 धावा केल्या होत्या.
काय म्हटलेत डब्ल्यूव्ही रमन वाचा
भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहिलेले डब्ल्यूव्ही रमन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले की, “मला वाटते की बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी सचिन तेंडुलकरला फलंदाजी सल्लागार म्हणून आणल्यास खेळाडूंना फायदा होऊ शकतो.” दुस-या कसोटी सामन्यासाठी काही दिवस शिल्लक राहिले आहेत.
याआधीही सचिनने केलीये विराटला मदत
विराट कोहली 10 वर्षांपूर्वी इंग्लंड दौऱ्यावर संघर्ष करताना दिसला होता. 2014 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत कोहलीने पाच डावांत केवळ 134 धावा केल्या होत्या. बऱ्याच वर्षांनंतर चर्चा होत असताना विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या सल्ल्यानंतर फलंदाजी कशी सुधारता आली हे सांगितले होते.
इंग्लडहून परत आल्यावर सचिन तेंडुलकर यांच्याशी चर्चा
विराटने सांगितले की, “इंग्लंडहून परतल्यानंतर मी सचिन तेंडुलकरशी बोललो आणि त्याच्यासोबत मुंबईत सरावही केला. मी त्याला सांगितले की मी माझ्या हिप पोझिशनवर काम करत आहे. त्याने मला सांगितले की, लांब पायऱ्यांनी चालणे खूप फायदेशीर आहे. थोडेसे कसे? मी या गोष्टी माझ्या हिप पोझिशनमध्ये जोडल्याबरोबरच फास्ट बॉलर्सवर फायद्याचे ठरेल का? त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना कोहलीने 86.50 च्या सरासरीने 692 धावा केल्या होत्या.