नवी दिल्ली : आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली असून, या मोसमात टीमने सलग 8 सामने गमावले आहेत. पण या मोसमात मुंबईचा एक खेळाडू खूप चर्चेत आहे. आम्ही बोलत आहोत दक्षिण आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसबद्दल. ब्रेविस प्रथमच आयपीएलमध्ये खेळत आहे आणि आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकत आहे. ब्रेविससोबत त्याची गर्लफ्रेंडही सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

ज्युनियर एबी डिव्हिलियर्स या नावाने प्रसिद्ध असलेल्या डेवाल्ड ब्रेव्हिसच्या मैत्रिणीचे नाव लिंडी मेरी आहे. लिंडी ही एक सोशल मीडिया सेन्सेशन आहे आणि तिचे इंस्टाग्रामवर 13,000 फॉलोअर्स आहेत. ब्रेविस गेल्या चार वर्षांपासून लिंडाला डेट करत आहे. दोघेही त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रोमँटिक फोटो पोस्ट करण्यास मागेपुढे पाहत नाहीत.

लिंडी मेरी डेवाल्ड ब्रेविससोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते. दोघांच्याही सुंदर छायाचित्रांवरून त्यांच्या मनात एकमेकांबद्दल किती प्रेम आहे, याचा अंदाज येतो. लिंडी खूप सुंदर दिसते.
डेवाल्ड ब्रेविसचा जन्म 29 एप्रिल 2003 ला जोहान्सबर्ग येथे झाला. असे म्हटले जाते की, ब्रेविसला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची आवड होती आणि दक्षिण आफ्रिकेचे दिग्गज एबी डिव्हिलियर्स यांच्या मार्गदर्शनाखाली तो क्रिकेट शिकला. दोघांनी मिळून अनेक नेट सेशन्स केले, त्यामुळे देवाल्ड स्वत:मध्ये सुधारणा करू शकला आहे.






