फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. त्याच वेळी, या हृदयद्रावक हल्ल्यात १७ हून अधिक पर्यटक जखमी झाले. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांपैकी दोघे पाकिस्तानचे असल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्याचा सर्वत्र तीव्र निषेध केला जात आहे. या भ्याड कृत्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले जात आहे. त्याचबरोबर आता पाकिस्तानी आणि भारतीय राजकीय नेते त्याचबरोबर मोठे व्यक्तिमत्व एकमेकांवर खुलेआम टीका करत आहेत.
पहलगाम हल्ल्यावर भारताच्या समर्थनार्थ चार माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूही समोर आले आहेत. त्यांनी या हल्ल्याचा उघड निषेध केला आहे. मोहम्मद हाफिजने त्याच्या माजी प्रियकराच्या अकाउंटवरून ट्विट केले आणि या हल्ल्याला हृदयद्रावक म्हटले. या ट्विटनंतर सोशल मीडियावर मोहम्मद हाफिज याना मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर पाकिस्तानी नेटकऱ्याकडून ट्रोल केले जात आहे.
Sad & heartbroken 💔 #PahalgamTerroristAttack
— Mohammad Hafeez (@MHafeez22) April 23, 2025
त्याच वेळी, बासित अली यांनी या हल्ल्यात प्राण गमावलेल्या पर्यटकांना शहीद घोषित केले. त्यांनी सांगितले की, ज्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केला त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाऊ नये. त्याचबरोबर त्यांना सर्वासमोर गोळ्या झाडून मारले पाहिजे एवढेच नव्हे तर ते असेही म्हणाले की, जर माझ्या मोठ्या भावाने देखील असेल केले असेल तर त्यालाही गोळ्या झाडून मारले पाहिजे असे त्यांनी त्यांच्या युट्युब चॅनेलवर सांगितले आहे.
दानिश कनेरिया यांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर भारताला सपोर्ट केला आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले आहे की, पहलगाममध्ये आणखी एक क्रूर हल्ला. बांगलादेशपासून बंगालपर्यंत काश्मीरपर्यंत, तीच मानसिकता हिंदूंना लक्ष्य करते. पण ‘धर्मनिरपेक्ष’ आणि न्यायव्यवस्था असा आग्रह धरतात की हल्लेखोर ‘पीडित अल्पसंख्याक’ आहेत. पीडितांना न्याय मिळायला हवा त्यानंतर देखील सोशल मीडियावर बोट उचलनाऱ्याना त्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
Another brutal attack in Pahalgam. From Bangladesh to Bengal to Kashmir, the same mindset targets Hindus. But ‘seculars’ and judiciary insist the attackers are ‘oppressed minorities.’ Victims deserve justice. pic.twitter.com/GtA5WpFjIr
— Danish Kaneria (@DanishKaneria61) April 22, 2025
मोहम्मद अमीर याने नंतर त्याला आयपीएलमध्ये खेळायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली आहे. आज भारताने पाकिस्तानच्या १८ हुन अधिक युटूबर चॅनेल बॅन केले आहेत. यामध्ये शोएब अख्तर, बासित अली यांसारख्या अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे.