भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) हे क्रिकेट (Cricket) विश्वातील मोठे नाव आहे. त्याच्या नेतृत्वाखाली अनेक खेळाडू तयार झाले असून त्यातील अनेक जण हे देशासाठी उत्तम खेळ दाखवत नाव उंचावत आहेत. मात्र अशातच एक असा खेळाडू आहे ज्याला सध्या पोटापाण्यासाठी टॅक्सी (Taxi) चालवून उदरनिर्वाह करावा लागत आहे.
आयपीएलच्या चैन्नई सुपरकिंग्स या संघात धोनीच्या नेतुर्त्वाखाली खेळलेल्या त्या खेळाडूचे नाव आहे सूरज रणदिव (Suraj Randiv). सूरज हा श्रीलंकेचा खेळाडू असून तो सध्या २०११ मध्ये भारतात खेळल्या गेलेल्या क्रिकेट विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाचा भाग होता. २०१२ मध्ये चेन्नईकडून खेळताना रणदीवने ८ सामन्यात ६ विकेट घेतल्या होत्या. श्रीलंकेकडून क्रिकेट खेळणारा सूरज रणदिव आता क्रिकेटर ते बस ड्रायव्हर झाला आहे.
भारतीय क्रिकेटचे चाहते सूरज रणदीवला नो-बॉलमुळे ओळखतात. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागला त्याने ९९ धावांवर बाद केलो होते. त्यावेळी सूरज रणदिव प्रसिद्धीच्या झोतात आला जेव्हा तो मुद्दाम नो बॉल टाकताना पकडला गेला. दरम्यान, वीरेंद्र सेहवागला शतक पूर्ण होऊ न देण्यासाठी दिलशानच्या सांगण्यावरून सूरज रणदीवने नो बॉल टाकला होता.त्यावेळी भारताला विजयासाठी एका धावेची गरज होती आणि सेहवाग 99 धावांवर फलंदाजी करत होता. सेहवागने ती एक धाव काढली असती तर त्याचे शतक पूर्ण झाले असते. अशा स्थितीत कट रचत असताना दिलशानने रणदीवला मुद्दाम नो बॉल टाकण्याचा सल्ला दिला आणि त्याने तेच केले. सेहवागने नो बॉलवर षटकार मारला असला तरी पंचांनी नो बॉलमुळे भारताला विजयी घोषित केले आणि त्याचा षटकार धावांमध्ये जोडला गेला नाही. सेहवाग ९९ धावांवर नाबाद राहिला.
श्रीलंकेचा माजी फिरकीपटू सूरज रणदीव २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियाला गेला होता, जिथे तो आता बस चालवण्याव्यतिरिक्त स्थानिक क्लबसाठी क्रिकेट खेळतो.