वैभव सूर्यवंशी(फोटो-सोशल मीडिया)
Vaibhav Suryavanshi is gaining popularity in England : भारताचा १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ गाजवल्यानंतर इंगलंडमध्ये आपल्या बॅटने धावांचा पाऊस पाडला आहे. त्या ज्या पद्धतीने खेळतो ते पाहून विरोधी संघाचा आत्मविश्वास कमी होऊन जातो. वैभव सूर्यवंशीने इंग्लंडमध्ये सर्वांचे मन जिंकून घेतली आहेत. कारण, त्याने आपल्या बॅटमधून तेथे ३० षटकारांची बरसात केली आहे. वैभव सूर्यवंशी सध्या भारताच्या १९ वर्षांखालील संघासह इंग्लंड दौऱ्यावर आहे. त्याच्या फलंदाजी त्याला इंग्लंडमध्ये मोठा सन्मान मिळवून देत आहे. ज्यासाठी तो पात्र आहे.
वैभव सूर्यवंशीने इंग्लंडमध्ये ३० षटकारांची बरसात कधी केली असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. यासोबत त्याला नेमका कोणता सन्मान मिळाला आहे? वैभव सूर्यवंशीने इंग्लंडमध्ये खेळलेल्या सामन्यांमध्ये ३० षटकार ठोकले आहेत. त्याने भारताच्या १९ वर्षांखालील संघासोबत आतापर्यंत तेथे ५ एकदिवसीय आणि १ कसोटी सामना खेळलेला आहे. या ६ सामन्यांमध्ये त्याने ३० षटकार खेचले आहेत. या ३० षटकारांपैकी वैभव सूर्यवंशीने ५ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९ षटकार मारून सर्वाधिक ३५५ धावा काढल्या आहेत. इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने १ षटकार मारला आहे. या कसोटीच्या दोन्ही डाव मिळून त्याने ७० धावा केल्या आहेत.
वैभव सूर्यवंशीचा हा इंग्लंडचा पहिलाच दौरा असून या दौऱ्यात त्याने आपल्या बॅटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ज्यामुळे त्याची स्टारडमची प्रतिमा देखील अधिक उजळ झाली आहे. त्याच्या वादळी फलंदाजीमुळे त्याला मिळालेल्या त्याच स्टारडम प्रतिमेचे परिणाम म्हणजे तेथील चाहते देखील त्याचा आदर करताना दिसून येत आहेत. इंग्लंडमध्ये वैभव सूर्यवंशीच्या आजूबाजूला केवळ त्याच्या चाहत्यांची गर्दी नव्हती तर तो त्यांना ऑटोग्राफ देखील देताना दिसला आहे. १४ वर्षांच्या वैभवसाठी हा एक मोठा अनुभव असणार आहे.
View this post on Instagram
A post shared by RevSportzOfficial | Sports News at Fingertips (@revsportz_official)
हेही वाचा : ICC Test batsmen rankings : जो रूट पुन्हा अव्व्लस्थानी, भारतीय खेळाडूंची क्रमवारीत घसरगुंडी…
वैभव सूर्यवंशी सहसा डाव्या हाताने गोलंदाजी आणि फलंदाजी करता दिसतो. पण जेव्हा इंग्लंडमधील त्याच्या चाहत्यांना त्याने ऑटोग्राफ दिली, तेव्हा तो उजव्या हाताने लिहित असल्याचे दिसले. म्हणजे तो उजव्या हाताने लिहितो हि माहिती समोर आली