सौजन्य - optusstadium पहिल्या कसोटीत कशी असेल Optus स्टेडियमची खेळपट्टी; जाणून घ्या हवामानाचा अंदाज आणि सविस्तर रिपोर्ट
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या पीएम 11 विरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने काही षटकांसाठी विकेटकीपिंगची जबाबदारी सरफराज खानकडे दिली होती. कारण ऋषभ पंतला काही काळ विश्रांती घेण्यास सांगितले होते. सरफराज विकेट कीपिंग करीत असताना त्याने ऑस्ट्रेलियन फलंदाज हॅनो जेकब्सला बाद करण्याची मागणी केली. कारण हॅनो जेकब्सने दोनदा चेंडू मारला.
तांत्रिकदृष्ट्या दोनदा चेंडू मारण्याची परवानगी नाही
वास्तविक, नियमानुसार, फलंदाजाला तांत्रिकदृष्ट्या दोनदा चेंडू मारण्याची परवानगी नाही. जर त्याने चेंडू विकेटच्या दिशेने सोडला तर अशा परिस्थितीत अंपायर त्याला आऊट देईल. पण जर आऊट होण्याची शक्यता नसेल, तरीही फलंदाजाने चेंडू मारला, तर अशा स्थितीत अंपायर त्याला आऊट देणार नाही. या सामन्यातही नेमके तेच घडले.
दोनदा चेंडूला हिट केल्यानंतर घडला मजेदार किस्सा
सरफराज खानचा अपिल व्यर्थ
नेमके असेच घडले जेव्हा पहिल्यांदा चेंडू बॅट्समन हॅनो जेकब्सला लागला तेव्हा तो चेंडू एकदा खाली पडला आणि नंतर परत वर आला. पण तो त्याच जागेवर उसळी मारून माघारी फिरला आणि स्टंपच्या दिशेने जात होता. यानंतर हॅनो जेकब्सने पुन्हा एकाद चेंडू बॅटने डिफेन्स केला, त्यानंतर सरफराज खानने जेकब्सला आऊटसाठी अपिल केली. मात्र, पंचांनी त्याला आऊट दिले नाही. सरफराजचे अपिल व्यर्थ गेले.
दुसरी चाचणी ६ डिसेंबरपासून
ऑस्ट्रेलियाच्या PM 11 विरुद्ध भारताने शानदार विजय नोंदवला होता. भारताने हा सामना 6 विकेटने जिंकला होता. ६ डिसेंबरपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध डे नाईट कसोटी सामना सुरू होणार आहे. रोहित शर्माचे पुनरागमन झाले आहे. तो भारतीय संघाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. पहिल्या सामन्यात बुमराहने कर्णधारपद भूषवले होते.
रोहित शर्माला सोडावी लागणार ओपनिंग
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ॲडलेड कसोटी सामन्यासाठी पूर्णपणे तयार झाला आहे. पंतप्रधान इलेव्हन विरुद्धच्या दोन दिवसीय सराव सामन्यात रोहित शर्मा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे रोहित शर्मा पर्थ कसोटी सामन्यात खेळू शकला नाही, अशा परिस्थितीत रोहित ॲडलेडमध्ये पिंक बॉल टेस्टच्या आव्हानासाठी पूर्णपणे तयार आहे. यासोबतच या कसोटी सामन्यासाठी रोहितने मोठ्या बदलाचे संकेतही दिले आहेत. हा बदल रोहित शर्माच्या फलंदाजीच्या स्थितीबाबत आहे. सराव सामन्यात मधल्या फळीत रोहित शर्मा फलंदाजीला आला. अशा परिस्थितीत टीम इंडियासाठी रोहित शर्माने मधल्या फळीत फलंदाजी केल्यास काय फायदे होतील ते जाणून घेऊया.
यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांची सलामी जोडी शानदार
रोहित शर्मा जगातील सर्वोत्कृष्ट सलामीवीर फलंदाजांपैकी एक आहे यात शंका नाही, पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील पर्थ कसोटी सामन्यात केएल राहुलसह यशस्वीने टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली आहे. रोहित शर्मा पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकला नाही. अशा स्थितीत राहुलने सलामीची भूमिका बजावली आणि त्याने ही संधी दोन्ही हातांनी मिळवली. रोहित शर्मा गेल्या काही काळापासून धावा काढण्यासाठी झगडत आहे. अशा परिस्थितीत, संघ व्यवस्थापन दुसऱ्या कसोटी सामन्यातही यशस्वी आणि राहुलला सलामी देण्याचा विचार करू शकते. अशा परिस्थितीत रोहित शर्माला सराव सामन्याप्रमाणे मधल्या फळीत फलंदाजी करावी लागू शकते. टीम इंडियाला याचा फायदा होईल की सलामीच्या जोडीची लय तुटणार नाही आणि रोहितच्या आगमनाने मधली फळी मजबूत होईल.