विराट कोहली (फोटो- ट्विटर)
इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानुसार भारताकडून कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्माने सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. मात्र शुभमन गिल केवळ 31 रन्सची खेळी करून आउट झाला. मात्र त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने भारताचा डाव सावरला.
मागील सामन्यात विराट कोहलीने निराशा केली. तो केवळ 5 रन्स करून आउट झाला. मात्र आजच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार अर्धशतक लगावले आहे. तसेच राहुल द्रविडचा रेकॉर्ड देखील मोडला आहे. विराटने इंग्लंडच्या मैदानावर नवा इतिहास रचला आहे. 4 रन्स करताच विराटने द्रविडचा रेकॉर्ड मोडला आहे.
IND Vs ENG Live: हॅरी ब्रूकने जिंकली पहिली लढाई; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय
विराट कोहली इंग्लंडमध्ये तीनही फॉर्मट सर्वाधिक रन्स करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. आधी हा रेकॉर्ड राहुल द्रविडच्या नावावर होता. द्रविडने 46 सामन्यांमध्ये 56 खेळींमध्ये 2645 रन्स केल्या होत्या. आता केवळ 4 रन्स करताच विराट कोहलीने द्रविडचा रेकॉर्ड मोडला आहे. सर्वाधिक रन्स करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये विराट कोहली, राहुल द्रविड, रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकरचा समावेश आहे.
सर्वाधिक रन्स करणारे भारतीय फलंदाज
1. विराट कोहली
2. राहुल द्रविड
3. सचिन तेंडुलकर
4. रोहित शर्मा
भारत: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शिवम दुबे, गुरनूर ब्रार/अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.
IND vs ENG: भारत-इंग्लंड दुसऱ्या वनडेची वेळ बदलली; सामना नेमका किती वाजता सुरू होणार?
इंग्लंड: जेकब बेथेल, बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रुक (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.






