फोटो सौजन्य - Royal Challengers Bengaluru
RCB vs KKR Playing 11 : 17 मे रोजी कोलकता आणि बंगळुरू यांच्यामध्ये लढत होणार आहे. त्यासाठी आता क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. विराट कोहली कसोटी क्रिकेटच्या निवृतीनंतर आता पहिल्यांदाच मैदानावर चाहत्यांना खेळताना पाहायला मिळणार आहे. काल म्हणजेच 15 मे रोजी बंगळुरूच्या मैदानावर मुसळधार पाऊस झाला त्यामुळे मैदानावर भरपुर पाणी साचले होते. त्यामुळे कोलकता आणि बंगळुरू सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. पण त्याआधी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन काय असणार आहे यासंदर्भात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल २०२५ मध्येच थांबवावे लागले. अशा परिस्थितीत, अनेक परदेशी खेळाडू त्यांच्या घरी परतले. आता परिस्थिती सामान्य झाली आहे, पण बरेच खेळाडू परतलेले नाहीत. दुसरीकडे, आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारही जखमी झाला. तथापि, त्याने आज सामन्यापूर्वी सराव केला. अशा परिस्थितीत तो कोलकाताविरुद्ध खेळताना दिसू शकतो.
KKR vs RCB सामन्यावर पावसाच सावट! सामना रद्द झाला तर आरसीबी प्लेऑफमध्ये पोहोचणार का?
आरसीबीकडून, जेकब बेथेल किंवा फिल सॉल्ट हे विराट कोहलीचे साथीदार असू शकतात. कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर कोहली मैदानावर उतरेल. देवदत्त पडिक्कलची जागा घेणाऱ्या मयंक अग्रवालला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली जाऊ शकते. कर्णधार पाटीदार चौथ्या क्रमांकावर आणि यष्टिरक्षक जितेश शर्मा पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. टिम डेव्हिड खालच्या क्रमात खेळू शकतो. कृणाल पंड्या पुन्हा एकदा अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत दिसू शकतो. गोलंदाजीची जबाबदारी रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, लुंगी न्गिडी आणि यश दयाल यांच्या खांद्यावर असू शकते.
जेकब बेथेल/फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, रजत पाटीदार (कर्णधार, फिटनेस), जितेश शर्मा (विकेटकिपर), टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, लुंगी एनगिडी, यश दयाल.
इम्पॅक्ट खेळाडू : सुयश शर्मा
प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी कोलकाता आपल्या नशिबावर अवलंबून असल्याने, रहमानुल्ला गुरबाज आणि सुनील नारायण हे दोघे डावाची सुरुवात करू शकतात. कर्णधार अजिंक्य रहाणे स्वतः तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. कोलकाता संघाला प्लेइंग ११ मध्ये जास्त बदल करायचे नाहीत. संघ अंगकृष रघुवंशी, मनीष पांडे, आंद्रे रसेल आणि रिंकू सिंगवर अवलंबून राहू शकतो.
रहमानउल्ला गुरबाज (विकेटकिपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंगक्रिश रघुवंशी, मनीष पांडे, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, मोईन अली, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
इम्पॅक्ट खेळाडू: हर्षित राणा