फोटो सौजन्य – X
इंडिया चॅम्पियन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 सुरू झाली आहे. या स्पर्धेत इंडिया चॅम्पियन्सचा पहिला सामना 20 जुलै रोजी पाकिस्तान चॅम्पियन्ससोबत होणार होता, परंतु भारतीय खेळाडूंनी या सामन्यावर बहिष्कार टाकला आणि पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार दिला. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. प्रत्यक्षात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर खेळाडूंमध्ये आणि संपूर्ण देशात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड संताप आहे.
ज्याचा परिणाम आता क्रीडा क्षेत्रातही दिसून येत आहे. त्याच वेळी, इंडिया चॅम्पियन्स आजपासून त्यांची WCL 2025 मोहीम सुरू करणार आहे. इंडिया चॅम्पियन्स आजपासून वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ मोहिमेला सुरुवात करणार आहे. इंडिया चॅम्पियन्सचा हा सामना दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्ससोबत होणार आहे. एबी डिव्हिलियर्सच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सने या स्पर्धेत एक सामना खेळला आहे.
पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना वेस्ट इंडिजशी झाला होता, हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता. आता दक्षिण आफ्रिका आपला दुसरा सामना गतविजेत्या इंडिया चॅम्पियन्ससोबत खेळणार आहे, ज्याचे नेतृत्व युवराज सिंग करत आहे.
इंडिया चॅम्पियन्स आणि साउथ आफ्रिका चॅम्पियन्स यांच्यातील हा सामना रात्री ९ वाजता खेळवला जाईल. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होईल, तर सामन्याचे थेट प्रक्षेपण फॅनकोड अॅप आणि त्यांच्या वेबसाइटवर होईल. भारत हा सामना जिंकून स्पर्धेची सुरुवात उत्तम पद्धतीने करू इच्छितो.
Hashim Amla reveals his top 3 batters at the World Championship of Legends… and drops a name he’s got his eyes on! 👀#WCL2025 👉 IND Champions vs SA Champions | TUE, 22nd JULY, 9 PM | LIVE on Star Sports Network pic.twitter.com/P1PtiUrV1h — Star Sports (@StarSportsIndia) July 20, 2025
भारतीय चॅम्पियन संघामध्ये काही नव्या एन्ट्री झाल्या आहेत. शिखर धवन याने निवृत्तीनंतर आता तो वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड मी खेळताना दिसणार आहे त्याचबरोबर पियुष चावला, वरून एरन हे नवे चेहरे खेळताना दिसणार आहेत. दुसरीकडे भारतीय महिला संघ एकदिवसीय मालिकेचा आज शेवटचा सामना खेळणार आहे. मालिकेमध्ये एक एक अशी बरोबरी आहे त्यामुळे आजचा सामना हा निर्णय असणार आहे. 23 जुलैपासून भारतीय पुरुष संघ हा चौथा कसोटी ला सुरुवात करणार आहे.
युवराज सिंग (कर्णधार), शिखर धवन, युसूफ पठाण, अंबाती रायडू, गुरकीरत मान, वरुण आरोन, सिद्धार्थ कौल, विनय कुमार, स्टुअर्ट बिन्नी, अभिमन्यू मिथु, राॅबीन उथप्पा, इरफान पठाण, सुरेश रैना, पियुष चावला, हरभजन सिंग