फोटो सौजन्य - KolkataKnightRiders/Delhi Capitals सोशल मीडिया
Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Playing 11 : दिल्ली कॅपिटल्सचा मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सामना झाला होता यामध्ये त्यांना घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला होता. आज दिल्ली कॅपिटल्स पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजेच अरुण जेटली स्टेडियमवर खेळणार आहे. आज म्हणजेच २९ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट राईडरशी होणार आहे. केकेआरचा मागील सामना पंजाब किंग्स विरुद्ध पावसामुळे रद्द करण्यात आला होता त्यामुळे त्यांना २ गुण न देता १ गुण देण्यात आला होता. आज दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत कोलकाता नाईट राइडर्सला प्ले ऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आजचा सामना जिंकणे अनिवार्य आहे.
दिल्लीने रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शेवटचा सामना खेळला ज्यामध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. आता दिल्ली विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. दोन्ही संघ विजयासाठी उत्सुक आहेत आणि म्हणूनच त्यांच्या प्लेइंग-११ बाबत मोठे पाऊल उचलू शकतात. दिल्लीसाठी शेवटच्या सामन्यात त्याची गोलंदाजी कमकुवत ठरली. मागील सामन्यात पराभवानंतर दिल्लीचा संघ अक्षरच्या नेतृत्वाखालील हा संघ कोलकाताविरुद्ध येथे एक बदल करू शकतो.
The man who lets his bat do the talking! 🔊@klrahul‘s knocks this season have been essential to #DC‘s solid batting order. 💪
Will he put up another clinical performance today? 🤔#IPLonJioStar 👉 #DCvKKR | TUE, 29th APR, 6:30 PM, Star Sports 1, Star Sports 1 Hindi &… pic.twitter.com/GA9RwrIaqS
— Star Sports (@StarSportsIndia) April 29, 2025
संघ दुष्मंथा चामीराला वगळून टी नटराजनला संधी देऊ शकतो. जर तो पूर्णपणे तंदुरुस्त असेल. दिल्लीने आरसीबीविरुद्ध प्रथम फलंदाजी केली आणि मोहित शर्माच्या जागी आशुतोष शर्माला प्रभावी खेळाडू म्हणून संघात आणले. कोलकाताविरुद्ध आशुतोष आणि मोहित यांचा प्रभावशाली खेळाडू म्हणूनही वापर करता येईल. फाफ डु प्लेसिसने गेल्या सामन्यात पुनरागमन केले आणि तो या सामन्यातही आपले स्थान कायम ठेवेल.
गेल्या सामन्यात कोलकाताच्या गोलंदाजांनीही निराशा केली. तथापि, कर्णधार अजिंक्य रहाणे या क्षेत्रात कोणतेही बदल करेल अशी शक्यता कमी दिसते. दिल्लीच्या मैदानाचा विचार करता, रहाणे पुन्हा एकदा क्विंटन डी कॉकला संधी देऊ शकतो. त्याच्या जागी, अपयशी ठरलेल्या रहमानउल्लाह गुरबाजला वगळता येईल. दिल्ली स्टेडियमचा विचार करता, डी कॉक हा संघासाठी योग्य पर्याय असू शकतो.
Vaibhav sooryavanshi शतक झळकावताच झाला मालामाल! बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
अक्षर पटेल (कर्णधार), अभिषेक पोरेल, फाफ डू प्लेसिस, करुण नायर, केएल राहुल, ट्रिस्टन स्टब्स, मोहित शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, टी. नटराजन
अजिंक्य रहाणे (कर्णधार), क्विंटन डी कॉक, सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रोवमन पॉवेल, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, अंगकृष्ण रघुवंशी.