फोटो सौजन्य - BCCI
भारत-दक्षिण आफ्रिका फायनल : भारतासमोर आज दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. T-२० विश्वचषकाचा शेवटचा फायनलचा सामना वर्ल्डकपमधील अपराजित संघांमध्ये रंगणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका हे संघ T-२० विश्वचषक २०२४ मध्ये अजुनपर्यत एकही सामना न गमावता अंतिम फेरीमध्ये पोहोचले आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरु होणार आहे. आजचा हा सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर रंगणार आहे. केन्सिंग्टन ओव्हल मैदानाच्या खेळपट्टीचा विचार केला तर कदाचित आजच्या सामन्यात वेगवान गोलंदाजांना फिरकीपटूंपेक्षा जास्त मदत मिळू शकते. यासोबतच खूप धावाही करता येतात.
या मैदानावर २०२२ मध्ये इंग्लंडने २२४ धावा केल्या होत्या. आता टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होणार आहे. बार्बाडोसमध्ये मोठी धावसंख्या होऊ शकते. त्यामुळे फलंदाजांना या खेळपट्टीचा नक्कीच फायदा होईल. या सामन्यात रोहित शर्मा स्फोटक खेळी खेळू शकतो. गेल्या दोन सामन्यांत रोहित सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. यासोबतच सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंतही चमत्कार करू शकतात. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २०० पेक्षा जास्त धावा केल्या तर त्यांच्यासाठी विजय सोपा होऊ शकतो.
गोलंदाजांना आणि फलंदाजांना या खेळपट्टीचा फायदा होणार आहे. पणतू वेगवान गोलंदाज अधिक यशस्वी होतील. त्यामुळे आजच्या प्लेइंग ११ मध्ये भारताच्या संघात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेसाठी अक्षर पटेल, बुमराह, अर्शदीप सिंह हे धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे भारताच्या प्लेइंग ११ मध्ये कोणताही बदल न होण्याची दाट शक्यता आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमत्कार करू शकतात. अर्शदीप सलामीवीरांना गारद करू शकतो. तो फॉर्मात आहे आणि जसप्रीत बुमराहसह एका टोकाची जबाबदारी सांभाळू शकतो. त्याचबरोबर उपकर्णधार हार्दिक पंड्याने कमी चेंडूंमध्ये विस्फोटक फलंदाजी करण्याचा पराक्रम केला आहे त्याचबरोबर तो चांगल्या फॉर्ममध्ये पण आहे.