फोटो सौजन्य : X
पर्पल कॅप टाॅप 5 : आज क्वालिफायर 2 चा सामना खेळवला जाणार आहे हा सामना मुंबई विरुद्ध पंजाब या दोन संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्याचे आयोजन अहमदाबादचा नरेंद्र मोदी स्टेडियमवर करण्यात आले. या सामन्याआधी पर्पल कॅपची शर्यत फारच मनोरंजक होत चालली आहे. सध्या गुजरात टायटन्सचा प्रसिद्ध कृष्णा पहिल्या स्थानावर विराजमान आहे. गुजरातच्या संघाला मुंबईकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे त्यामुळे आता गुजरातचा संघ स्पर्धेमधून बाहेर झाला आहे आता पर्पल कॅपवर कब्जा करण्यासाठी मुंबई आणि बंगळुरूच्या या खेळाडूंना संधी आहे.
पर्पल कॅपच्या टॉप ५ गोलंदाजांबद्दल सांगायचे झाले तर पाचव्या स्थानावर गुजरात टायटन्सचा साई किशोर आहे. त्याने पंधरा सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेतले आहेत. चौथ्या स्थानावर ट्रेंट बोल्ट आहे त्याने 15 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतले आहेत. प्रसिद्ध कृष्णाचे स्थान मिळवण्यासाठी बोल्ट याला अजूनही चार विकेट ची गरज आहे. तिसरा स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा जोश हेझलवूड हा आहे त्याने 11 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतले आहेत. त्याला पहिले स्थान गाठण्यासाठी अजूनही चार विकेटची गरज आहे. ट्रेंट बोल्ट आणि जोस हेझलवूड या दोघांना पहिल्या स्थानावर कब्जा करण्याची संधी आहे.
पर्पल कॅपचे शर्यतीत दुसऱ्या स्थानावर चेन्नई सुपर किंग्सचा नूर अहमद आहे. त्याने १४ सामान्यांमध्ये २४ विकेट्स घेतले आहेत पण आता चेन्नईचा संघ प्लेऑफ मधून बाहेर झाल्यामुळे तो आता २४ विकेट्सह हा सिझन संपवेल. पहिल्या स्थानावर प्रसिद्ध कृष्णा आहे त्याने या सीझनमध्ये कमालीची कामगिरी केली आहे त्याने संघाला त्याच्या गोलंदाजीने विजय मिळवून दिले आहेत. प्रसिद्ध कृष्णा याने संघाला 15 सामन्यांमध्ये 25 विकेट्स मिळवून दिले आहेत पण गुजरातचा संघ हा क्वालिफायर दोन मधून बाद झाल्यामुळे प्रसिद्ध कृष्णा हा 25 विकेट्सने हा सिझन संपवेल.
जोस हेझलवूड आणि ट्रेंट बोल्ट या दोघांना प्रसिद्ध कृष्णाचे स्थान देण्याचे संधी आहे आज मुंबईचा संघ हा पंजाब किंग्स विरुद्ध लढणार आहे यावेळी ट्रेंड कशी कामगिरी करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल त्याचबरोबर बंगरूळचा संघ हा फायनलच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे त्यामुळे हेझलवुड् सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे तो कशी कामगिरी करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल.