दिल्ली : टी २० विश्वचषकापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया (India Vs Australia) दरम्यान टी २० मालिका खेळली जात आहे. मोहाली मध्ये २० सप्टेंबर रोजी झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करून १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताच्या पराभवासाठी गोलंदाजांच्या खराब कामगिरीला दोष दिला जात आहे. अशातच या सामन्यादरम्यान रोहित शर्माने (Rohit Sharma) रागात दिनेश कार्तिकचा (Dinesh Kartik) गळा पकडल्याची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओ बद्दल सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरु असताना भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याने याबाबत मोठा खुलासा केला आहे.
सूर्यकुमार (Suryakumar Yadav) यादव म्हणाले की, मोहाली टी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांच्यात फक्त विनोद झाला होता. दोन्ही खेळाडू खूप दिवसांपासून एकत्र खेळत आहेत. त्यामुळे हे खूप सामान्य आहे. पहिल्या T20 सामन्यादरम्यान कर्णधार रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकचा विनोद करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही मस्करी करताना रोहित दिनेश कार्तिकचा गळा धरतांना दिसत आहेत.
[read_also content=”आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा टी २० सामना https://www.navarashtra.com/sports/india-vs-australia-2nd-t20-match-today-328824.html”]
पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान दिनेश कार्तिकने ग्लेन मॅक्सवेलचा झेल पकडला, परंतु त्याने बाद करण्याचे अपील केले नाही. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मजेदार पद्धतीने दिनेश कार्तिकची गळा पकडली होता. या संपूर्ण प्रकरणावर सूर्यकुमार यादव म्हणाले की, जेव्हा डीआरएसचा विचार केला जातो तेव्हा काही वेळा आवाज फार मागे जात नाही. या सामन्यात भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण अत्यंत निराशाजनक होते. संघाने तीन झेल सोडले. या पराभवात क्षेत्ररक्षणासोबतच गोलंदाजीही खराब होती. अक्षर पटेल वगळता सर्वांनी फलंदाजांना भरपूर धावा दिल्या.
tough love pic.twitter.com/o1BYZrTZw8
— Sritama (Ross Taylor’s version) (@cricketpun_duh) September 20, 2022