मोहम्मद सिराज (फोटो- ians)
भारत विरुद्ध अफगणिस्तानमध्ये होणार कसोटी सामना
शुभमन गिल करणार भारताचे नेतृत्व
मोहम्मद सिराज खेळणार की नाही याकडे लक्ष
Mohhmemad Siraj: भारत आणि अफगणिस्तानमध्ये 6 जूनपासून एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. शुभमन गिल भारताचे नेतृत्व करणार आहे. न्यू चंदीगडमध्ये हा एकमेव कसोटी सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघ सराव करत आहे. त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मात्र या सामन्यात मोहम्मद सिराज खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोहम्मद सिराज हा भारताचा वेगवान खेळाडू आहे. तो सलग क्रिकेट खेळत आहे. आयपीएलमध्ये तो गुजरात टायटन्सकडून खेळत होता. आता अफगणिस्तानविरुद्धच्या भारतीय संघात मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला आहे. या सिरिजमध्ये जसप्रीत बूमराहला विश्रांती देण्यात आली आहे. हर्षित राणा आणि आकाश दीप दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीत. त्यामुळे सिराजवर मोठी जबाबदारी असणार आहे.
मोहम्मद सिराज सलग क्रिकेट खेळत आहे. सिराज मुल्लानपूरमध्ये दाखल झाला आहे. मात्र कदाचित तो या सामन्यापासून दूर राहण्याची शक्यता आहे. 6 जूनपासून सामना सुरू होणार आहे. मात्र त्याआधी एक दिवस कर्णधार शुभमन गिल माध्यमाशी संवाद साधण्याची शक्यता आहे. त्यावलेस मोहम्मद सिराज खेळणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.
मोहम्मद सिराज जर खेळू शकला नाही तर प्रसिद्ध कृष्णा भारताच्या संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. या सामन्यात औकीब नबीला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सध्या औकीब नबी नेट बॉलर म्हणून चंदीगडमध्ये दाखल झाला आहे. 6 जूनपासून सुरू होणारा सामना चंदीगडमध्ये होणार आहे. सामना सुरू होण्याच्या आधी सिराज खेळणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.
6 जूनपासून चंदीगडमध्ये महामुकाबला
6 जूनपासून भारत अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. न्यू चंदिगढ येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (मुल्लानपूर) येथे खेळवला जाईल. दरम्यान बीसीसीआयने भारतीय संघाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये भारतीय खेळाडू कसोटी सामन्याचा सराव करताना दिसून येत आहेत.
IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध BCCI ने दिली ‘या’ नवीन चेहऱ्यांना संधी, दिग्गज खेळाडूंचा पत्ता कट
बीसीसीआयने टीम इंडियाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये भारताचा संघ फिल्डिंगचा सराव करताना दिसून येत आहे. त्यानंतर खेळाडू फलंदाजी करताना दिसून येत आहे.नेटमध्ये कुलदीप यादव आणि केएल राहुल आणि दुसरे स्पिनर्स सराव करताना दिसत आहेत. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वायल देखील सराव करत आहेत. तर शेवटी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील पाहायला मिळत आहे.






