बीसीसीआयचे हायकोर्टात उत्तर (फोटो- सोशल मिडिया])
नेमके प्रकरण काय?
12 युवा खेळाडूंनी मुंबई हायकोर्टात बीसीसीआयच्या 2023 च्या निर्णयाविरोधात याचिका देखील केली होती. त्यावर सुनावणी झाली. बीसीसीआयने 2023 मध्ये ओव्हरसीज सिटिजन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय अंतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय पासपोर्ट असणे आवश्यक असल्याचे नियम जारी केला होता. या निर्णयामुळे परदेशी पासपोर्ट असणारे आणि ओसिआय असणारे खेळाडू या नियमांमध्ये बसले नाहीत.
त्यामुळे या 12 युवा खेळाडूंनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आम्ही अनेक वर्षांपासून भारतात राहत आहोत. या ठिकाणी सराव करत आहोत, खेळत आहोत. अचानक बीसीसीआयने असा नियम केल्याने आमच्यावर अन्याय झाल्यासारखे आहे. यावर आता बीसीसीआयने आपले उत्तर हायकोर्टात दिले आहे.
क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! Rohit च्या निवृत्तीची चर्चा अन् ‘या’ खेळाडूंचं करिअर धोक्यात? चाहते चिंतेत
मुंबई हायकोर्टात बीसीसीआयने आपले उत्तर दिले आहे. भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघात केवळ भारतीय खेळाडूचीच निवड केली जाते. देशांतर्गत क्रिकेटमधूनच राष्ट्रीय क्रिकेट संघात निवडीचा मुख्य स्त्रोत आहे. जे खेळाडू भविष्यात भारतासाठी खेळूच शकणार नाहीत, त्यांना या स्पर्धांमध्ये खेळवून त्यांच्या हक्काची जागा मर्यादित करता येणार नाही.
कोर्टाने काय म्हटले?
तुम्ही परदेशी नागरिक असाल तर, तुमच्या देशांमध्ये देखील क्रिकेट खेळण्याच्या आणि करियरच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात. भारतामध्ये क्रिकेटचे महत्व अधिक आहे. भविष्यात भारतीय नागरिकत्व तुम्हाला मिळाले तर ते भारतात येऊन क्रिकेट खेळू शकतात.
IND Vs ENG: भेंडी आउटच होत नाही! कायम नॉट आउट; Joe Root ला टीम इंडिया कशी रोखणार?
दोन्ही पक्षांचा युक्तिवाद मुंबई हायकोर्टाने ऐकून घेतला. आता या प्रकरणात पुढील सुंवणी 13 ऑगस्ट रोजी होणार आहे. या प्रकरणात काय निर्णय येणार ही पहावे लागणार आहे. त्यामुळे सर्वांचे लालक्ष पुढील सूनवणीकडे लागले आहे.






