beaten (फोटो सौजन्य- social media)
डोंबिवली, जुनी डोंबिवली पश्चिममध्ये इंग्रजी शब्दावरून मराठी-उत्तर भारतीय वादाला चिघळण्याची घटना समोर आली आहे. ‘Excuse me’ असं बोलल्याने महिला आणि तिच्या कुटुंबियांना भर रस्त्यात मारहाण झाली. विष्णूनगर पोलिसांनी या प्रकरणी तक्रारी नोंदवत तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.
Ajit Pawar News: अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंना अक्षरश: झापलचं; देवगिरी बंगल्यावर नेमकं काय घडलं?
७ एप्रिल २०२५ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गणेश श्रद्धा बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या पुनम अंकीत गुप्ता या महिला त्यांच्या दोन मैत्रिणींसोबत घराकडे परतत होत्या. त्याच दरम्यान, बिल्डिंगच्या बाहेर रस्त्यावर काही लोक उभे होते. त्या लोकांना वाट करून देण्यासाठी पुनम यांनी Excuse me असे इंग्रजीत म्हटले. मात्र या साध्या वाक्यावरून तिथे उभे असलेल्या अनिल पवार, त्यांची पत्नी आणि बाबासाहेब गोविंद ढबाले यांचा संताप अनावर झाला.
मदतीला आलेल्या दोघांनाही मारहाण
या तिघांनी “इंग्रजी नको, मराठीत बोला” असे म्हणत पुनम आणि त्यांच्या मैत्रिणीला चापट्या आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, गोंधळ ऐकून मदतीला आलेले पुनम यांचे पती आणि दुसरी मैत्रीण यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पुनम यांच्या नाकातील फुलीसुद्धा तुटली असून, त्यांचे शारीरिक आणि मानसिक नुकसान झाले आहे.
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
या प्रकाराचा व्हिडिओ घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतरांनी काढून सोशल मीडियावर पोस्ट केला असून, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या घटनेनंतर दोन्ही गटांनी विष्णूनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ११५(२), ३५२ आणि ३२४ (४) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.