फोटो सौजन्य - JioHotstar सोशल मीडिया
मेग लॅनिंगचा रडण्याचा व्हिडिओ व्हायरल : महिला प्रीमियर लीग २०२५ चा फायनलचा सामना काल झाला.यामध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये लढत पाहायला मिळाली आणि कालचा सामना फारच मनोरंजक राहिला. शेवटच्या चेंडुपर्यत सामना गेला आणि कोण विजयी होईल हे सांगणे कठीण झाले होते. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने विजय मिळवून दुसऱ्यांदा जेतेपद नावावर केले आहे तर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने तिसऱ्या फायनलमध्ये प्रवेश करूनही ट्रॉफीपासून दूर राहिले. कालच्या सामन्यांनंतर मुंबई इंडियन्सचे खेळाडू आनंदी होते तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सच्या संघाच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहायला मिळाले.
दिल्ली कॅपिटल्स संघ पुन्हा एकदा जेतेपदाच्या जवळ पोहोचला होता पण जिंकू शकला नाही तिसऱ्यांदा दिल्लीचे जेतेपद हुकले आहे. शनिवारी महिला प्रीमियर लीग (WPL) २०२५ च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध संघाला ८ धावांनी पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे विजेतेपदाची त्यांची प्रतीक्षा वाढली. सलग तिसऱ्यांदा अंतिम सामना गमावल्यानंतर, दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती रडताना दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओने त्याच्या चाहत्यांनाही खूप भावनिक केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये, लॅनिंग प्रथम तिचे अश्रू पुसताना दिसते. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने तिच्या सहकाऱ्याने सांत्वन दिले तेव्हा तिने हलकेसे स्मितहास्य केले.
Even “World’s Greatest Captain” also have a day like this
Will comeback Stronger like MegLanning do ❤️🩹🔥
The Next Year is ours..pic.twitter.com/oHa0nu8O2f#WPL2025— ᴋᴀʀᴛʜɪ ❤️🔥 (@RajakumaruduX) March 15, 2025
सामन्यानंतर बोलताना लॅनिंग म्हणाली की, ‘आमचा आणखी एक चांगला हंगाम गेला, पण दुर्दैवाने आम्ही जिंकू शकलो नाही. पण आम्ही संपूर्ण सीझनमध्ये चमकदार कामगिरी केली आहे त्याचबरोबर मुंबई संघाचे अभिनंदन देखील केले. १५० धावांचा पाठलाग करणे हे आमच्यासाठी चांगले लक्ष्य होते. आम्ही आणखी चांगला खेळ दाखवू शकलो असतो, पण मला संघाचा अभिमान आहे.
लॅनिंगने तिच्या कर्णधारपदाखाली एकही महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकले नसले तरी तिने तिच्या देश ऑस्ट्रेलियाला एक-दोन नव्हे तर पाच ट्रॉफी जिंकण्यास मदत केली आहे. लॅनिंग पाच आयसीसी महिला टी-२० विश्वचषक आणि दोन आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या संघांचा भाग आहे. विशेष म्हणजे त्याने कर्णधार म्हणून यापैकी सहा जेतेपदे जिंकली आहेत. या दिग्गज खेळाडूने नोव्हेंबर २०२३ मध्ये वयाच्या ३१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.