पुण्याच्या हरीश साळवीला विजेतेपद (फोटो- सोशल मिडिया)
याआधीच्या उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात अव्वल मानांकित हरीश साळवीने ठाण्याच्या प्रफुल्ल वाघचाव ११-६, १०-१२, ११-३, ११-७ असा संघर्षपूर्ण पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या लढतीत पुण्याच्या प्रदीप गुप्ताने तिसऱ्या मानांकित अविनाश जोशीचा ११-६, १२-१०, ८-११, ९-११, ११-९ असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली.
‘शारदा स्पोर्ट्स सेंटर’ येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित स्वरूप भादलकरने दुसऱ्या मानांकित अनुज फुलसुंदरचा ११-७, ११-४, ११-९ असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. तिसऱ्या मानांकित प्रणव घोलकरने सहाव्या मानांकित श्रेयस माणकेश्वरचे आव्हान ८-११, ११-८, १४-१२, ११-७ असे मोडीत काढले.
DSP Trophy Cricket: पुणेरी स्ट्रायकर्स आणि फिअरलेस फायटर्सची विजयी घौडदौड
१९ वर्षांखालील मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरीत बिगर मानांकित निधी भांडारकरने अव्वल मानांकित आद्या गवत्रेचा ५-११, ११-७, ११-५, ३-११, ११-६ असा पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. नीरजा देशमुख हिने चौथ्या मानांकित मेधा कोत्राला ११-४, ११-७, ११-५ असे पराभूत केले. सई कुलकर्णीने दुसऱ्या मानांकित जान्हवी फणसेचा ५-११, ११-९, ११-४, १०-१२, ११-९ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
सांगलीत रंगणार ‘विश्वजित मराठी सेलिब्रिटी Cricket League’; ‘या’ तारखेला रंगणार ‘VMPL’चा महासंग्राम
उदय भालचंद्र यांच्या हस्ते उद्घाटन
याआधी स्पर्धेचे उद्घाटन बालुफ ऑटोमेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. उदय भालचंद्र यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या उपाध्यक्षा स्मिता बोडस, सचिव श्रीराम कोनकर, आशिष बोडस, स्पर्धेच्या संयुक्त संयोजन सचिव आश्लेषा बोडस, श्रीकांत अंतुरकर, सुरेंद्र देशपांडे, मोहन उसगावकर, मनिषा बोडस, नितीश गोडबोले, चोला मंडलम फायनान्सचे अमित कुमार, गुरु राघवेंद्र नाडगौडा, दिपेश अभ्यंकर आणि मुख्य पंच मधुकर लोणारे आदी मान्यवर उपस्थित होते.






