पावसाळ्यात सतत फेसवॉश करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या चेहऱ्यावर रॅश आणि लालसरपणा वाढण्याची कारणे
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सगळीकडे थंडगार वातावरणात झाले आहे. या दिवसांमध्ये वातावरणात वाढलेल्या ओलाव्यामुळे त्वचा खूप जास्त चिकट आणि तेलकट होऊन जाते. बाहेर कुठेही जाऊन आल्यानंतर लगेच त्वचा तेलकट आणि चिकट होते. त्वचेवर वाढलेल्या चिकटपणामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि मोठे फोड येण्याची खूप जास्त शक्यता असते. त्वचेवर वाढलेला चिकटपणा कमी करण्यासाठी महिला सतत फेसवॉश करतात किंवा चेहऱ्यावर वारंवार पाणी मारतात. पण पावसाळ्यात खरंच त्वचा वारंवार स्वच्छ करणे आवश्यक आहे? चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)
Natural Collagen Booster : कोलेजनसाठी हजारो रुपये खर्च कशाला? ‘हे’ 5 पदार्थ करतील नैसर्गिक कमाल
चेहरा स्वच्छ धुवणे फार आवश्यक आहे. पण दिवसभरातून ५ ते ६ वेळा चेहरा स्वच्छ करणे अजिबात फायदेशीर नाही. यामुळे चेहऱ्यामधील नैसर्गिक ओलावा कमी होण्यासोबतच त्वचेतील तेल सुद्धा कमी होऊन जाते. सतत चेहरा धुतल्यामुळे त्वचेवर कोरडेपणा वाढून त्वचा अधिक तेल सोडण्यास सुरुवात करते. त्यामुळे दिवसभरातून दोनदा किंवा तीनदाच त्वचा पाण्याने स्वच्छ करावी. त्वचेमधील तेल आणि पीएच पातळी बिघडल्यानंतर त्वचा खूप जास्त तेल सोडण्यास सुरुवात करते.
दिवसभरातून दोनदा किंवा तीनदाच त्वचा पाण्याने आणि सौम्य फेशवॉशचा वापर करून स्वच्छ करावी. सकाळी, दुपारी आणि रात्रीच्या वेळी त्वचा धुवावी. तेलकट किंवा मुरुमांची समस्या असल्यास जास्त त्वचा पाण्याने स्वच्छ करू नये. याशिवाय चेहऱ्यावर आलेल्या मुरूम आणि पिंपल्सला अजिबात हात लावू नये. यामुळे पिंपल्स कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू शकतात.
पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर त्वचा खूप जास्त चिकट आणि तेलकट होते. त्यामुळे बदलत्या ऋतूनुसार त्वचेची काळजी घेणे फार आवश्यक आहे. चेहरा फेसवॉश लावून त्वचा स्वच्छ केल्यानंतर कोरड्या कपड्याने त्वचा पुसून घ्यावी. त्यानंतर त्वचेला सूट होईल असे टोनर लावावे. त्यानंतर हलक्या स्वरूपाचे मॉइश्चरायझर लावावे. २ मिनिटं थांबून नंतर चेहऱ्यावर चांगल्या दर्जाचे आणि त्वचेला सूट होईल असे कोणतेही सनस्क्रीन लावावे. सनस्क्रीन लावल्यामुळे त्वचेच्या हानिकारक किरणांपासून रक्षण होते. स्किन केअर रुटीनसोबतच त्वचेला आतून पोषण देणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे.
Dark Circles: ८ तास झोपूनही डोळ्यांखाली डार्क सर्कल्स? दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या खरी कारणे
त्वचा आतून हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. पाणी प्यायल्यामुळे शरीरातील घाण बाहेर पडून जाते. तसेच आहारात पालेभाज्या, फळे आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. मेकअप केल्यानंतर झोपण्याआधी आवर्जून मेकअप काढून त्वचा स्वच्छ करावी. कारण रात्रीच्या वेळी त्वचेच्या पेशी दुरुस्त होत असतात. स्वच्छ मेकअप टूल्स व ॲप्लिकेटर्सचा वापर करणे फार आवश्यक आहे.






