औरंगजेबच्या समर्थनार्थ व्हॉट्सॲप स्टेटस ठेवणं तरुणाला भोवलं; पोलिसांना माहिती मिळताच... (File Photo : WhatsApp)
WhatsApp जगभरातील लोकप्रिय मॅसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. आपल्या मित्र – मैत्रिणींसोबत आणि कुटूंबियांसोबत संवाद साधण्यासाठी WhatsApp चा वापर केला जातो. मॅसेजिंग आणि कॉलिंगसोबतच आता WhatsApp लोक रिकव्हरीसाठी देखील मदत करणार आहे. क्रेडिटजेनिक्स आणि स्पोक्टो सारख्या कर्ज वसूल करणाऱ्या स्टार्टअप्स त्यांच्या ग्राहकांशी चांगल्या संवाद साधण्यासाठी या प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. पण आता WhatsApp केवळ संवाद सधण्यासाठी वापरले जात नसून त्याचा वापर लोन रिकवरीसाठी देखील केला जात आहे.
पूर्वी, कंपन्या कर्ज वसुलीसाठी ग्राहकांना पेमेंट रिमाइंडर संदेश पाठवत असत. त्यामुळे त्यांचा संदेश खर्च वाढला. यामुळे काही कंपन्यांना नुकसान देखील सहन करावं लागत होत. मात्र यानंतर कंपन्यांनी WhatsApp चा वापर करण्यास सुरुवात केली. कारण WhatsApp ने युटिलिटी आणि ऑपरेशनल कॅटेगरीजमधील मेसेजेसच्या किमतीत 50 टक्क्यांनी कपात केली आहे. त्यामुळे एका मॅसेजची किंमत सुमारे 12 ते 15 पैसे झाली आहे. तथापि, जर तीच माहिती एसएमएसद्वारे पाठवायची असेल तर एका मॅसेजची किंमत अंदाजे 35 पैसे आहे. ज्यामुळे कंपन्यांना खर्च अधिक होतो, आणि त्यांचे जास्त पैसे खर्च होतात. मात्र WhatsApp व्दारे मॅसेज पाठवून पैशांची बचत केली जाऊ शकते. क्रेडजेनिक्सचे सह-संस्थापक ऋषभ गोयल यांच्या मते, WhatsApp मेसेजिंग खर्चात मोठी बचत करते. (फोटो सौजन्य – Pinterest)
ऑटोमेटेड रिमाइंडर: बँक आणि NBFCs (नोन बँकिंग फाइनेंशियल कंपनीज) WhatsApp व्दारे कर्ज परतफेडीच्या तारखेपूर्वी ग्राहकांना रिमाइंडर मॅसेज पाठवतात. जेणेकरून कर्ज घेणारी व्यक्ती वेळेवर पैसे भरू शकेल.
कस्टमाइज्ड नोटिफिकेशन्स: ग्राहकांच्या कर्जाची रक्कम, व्याजदर आणि पेमेंट तारखेशी संबंधित सर्व तपशील थेट त्यांच्या WhatsApp वर पाठवले जातात.
सुरक्षित पेमेंट लिंक: अनेक कंपन्या WhatsApp वर सुरक्षित पेमेंट लिंक पाठवतात ज्याद्वारे ग्राहक एका क्लिकवर पेमेंट करू शकतात. यामुळे बनावट लिंक्सवर क्लिक करण्याचा गोंधळ कमी होतो, कारण संदेश कंपनीच्या अधिकृत नंबरवरून येतो.
कस्टमर सपोर्ट: जर एखाद्या ग्राहकाला कर्ज फेडण्यात काही अडचण येत असेल, तर अशावेळी WhatsApp चॅटबॉट किंवा लाईव्ह एजंट त्यांना मदत करू शकतात.
इन्स्टंट WhatsApp मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर मॅसेज जलद पाठवले जातात. WhatsApp वर मॅसेज पाठवण्यासाठी तुम्हाला केवळ चांगल्या इंटरनेटची गरज आहे. WhatsApp वर पाठवलेल्या मॅसेजचा ग्राहक त्वरित प्रतिसाद देऊ शकतील. WhatsApp द्वारे कर्ज वसूल करण्याची ही पद्धत फोन कॉल किंवा फील्ड वर्कच्या तुलनेत अधिक फायदेशीर आहे. ही एक कस्टमर्स फ्रेंडली प्रोसेस आहे. ग्राहकांना त्यांच्या घरी येणाऱ्या कॉल किंवा रिकव्हरी एजंट्सच्या त्रासाला तोंड द्यावे लागत नाही. याशिवाय, कंपन्यांना महागड्या एसएमएसचा खर्च देखील सहन करावा लागत नाही. त्यांना केवळ त्यांच्या ग्राहकांना एक मॅसेज सेंड करण्याची गरज आहे.
जरी कंपन्यांना याचा फायदा होत असला तरी काही घटनांमध्ये ग्राहकांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. WhatsApp व्दारे पाठवल्या जाणाऱ्या मॅसेजमधून ग्राहकांची माहिती लीक होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते. जर फील्ड एजंट्स WhatsApp वर कलेक्शन मॅसेज पाठवतात, तर त्यामुळे वैयक्तिक डेटा लीक होण्याची शक्यता वाढते. यामुळे कर्ज घेणाऱ्याची गोपनीयता धोक्यात येऊ शकते.