काय सांगता! Apple फ्रीमध्ये दुरुस्त करणार हे डिव्हाईस, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व डिटेल्स
टेक जायंट कंपनी अॅपल केवळ त्यांच्या प्रिमियम डिव्हाईससाठीच नाही तर त्यांच्या सर्विससाठी देखील जगभरात प्रसिद्ध आहे. अॅपलच्या प्रत्येक डिव्हाईसची युजर्समध्ये एक वेगळीच क्रेझ आहे. या डिव्हाईसची किंमत जास्त असली तरी त्यामध्ये अनेक फीचर्स आणि सिक्योरिटी अपडेट देखील दिलेले असतात. इतर टेक कंपन्यांच्या डिव्हाईसशी तुलना करता अॅपल डिव्हाईसमध्ये फार कमी समस्या पाहायला मिळतात. (फोटो सौजन्य – Pinterest)
जेव्हा अॅपलच्या कोणत्याही डिव्हाईसमध्ये समस्या अढळते तेव्हा कंपनी ती समस्या सोडवण्यासाठी आणि युजर्सना चांगली सर्विस देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करते. डिव्हाईसमधील समस्या लवकरात लवकर कशी सोडवली जाऊ शकते, यासाठी कंपनी नेहमीच प्रयत्न करत असते. हे चित्र आता आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. गेल्या काही काळापासून 2023 Mac मिनी मॉडल्समध्ये स्लीप मोड ऑन केल्यानंतर डिव्हाईस सुरु न होण्याची समस्या निर्माण झाली आहे. एकदा तुम्ही डिव्हाईसमध्ये स्लीप मोड ऑन केला तर डिव्हाईस पुन्हा सुरु होत नाही. हीच समस्या सोडवण्यासाठी आता कंपनीने एक प्रोग्राम सुरु केला आहे. या प्रोग्राममध्ये युजर्सची ही समस्या फ्रीमध्ये सोडवली जाणार आहे, त्याच्यासाठी कोणतेही जास्तीचे पैसे देण्याची देखील गरज नाही.
कंपनीचं असं म्हणणं आहे की, जर तुमचे Mac mini स्लीप मोडवर गेल्यानंतर पुन्हा ऑन होत नसेल तर तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही. तुम्ही अगदी फ्रीमध्ये तुमचे हे बिघडलेले डिव्हाईस दुरुस्त करू शकता, यासाठी तुम्हाला कोणत्याही एक्स्ट्रा कॉस्टची गरज भासणार नाही. युजर्सना या सर्विसचा वापर करता यावा, यासाठी कंपनीने एक खास फ्री रिपेयर प्रोग्राम लाँच केला आहे. हा मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट 2023 Mac mini च्या काही मॉडेल्समध्ये पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये M2 चिपचा वापर करण्यात आला आहे. इंटरनल हार्डवेयरच्या चुकीमुळे युजर्सना या समस्येचा सामना करावा लागत आहे.
विमान प्रवासात हे 4 गॅझेट्स बाळगणं म्हणजे अपघाताला आमंत्रण, तुम्हीही करताय का या चूका?
ही समस्या अशा Mac मिनीमध्ये पाहायला मिळत आहे, ज्यांचे उत्पादन 16 जून, 2024 आणि 23 नोव्हेंबर, 2024 दरम्यान झाले होते. म्हणजेच, जर कोणतेही डिव्हाईस या उत्पादन कालावधीत येत असेल आणि अशा कोणत्याही समस्येचा सामना करत असेल, तर अॅपल स्वतःच्या सेवा केंद्राद्वारे किंवा अॅपल अधिकृत सर्विस प्रोवाइडर्सद्वारे ही समस्या मोफत दुरुस्त करेल. त्यामुळे युजर्सना ही समस्या सोडवण्यााठी पैसे खर्च करण्याची गरज नाही.
मॅन्युफॅक्चर डेट कशा प्रकारे शोधू शकता?
अॅपल डिव्हाईसची मॅन्युफॅक्चर डेट शोधण्यासाठी Apple च्या सपोर्ट वेबसाइटवर एक डेडिकेटेड टूल देण्यात आलं आहे. तुम्ही तुमच्या डिव्हाईसचा सीरियल नंबर एंटर करून मॅन्युफॅक्चर डेट शोधू शकता.