करोडो iPhone यूजर्ससाठी खुशखबर! iOS च्या नव्या अपडेटने बदलणार अनुभव, RCS Chats सह मिळणार हे खास फीचर्स
Free Fire MAX: मोफत मिळणारे Redeem Codes वापरताय? ‘या’ चुका टाळा… अन्यथा अकाउंट होऊ शकतं हॅक
जर तुम्हाला आयओएस 26.5 अपडेट डाउनलोड करायचे असेल तर यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन जनरलवर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला सॉफ्टवेअर अपडेट पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या आयफोनसाठी नवीन अपडेट इंस्टॉल करू शकणार आहेत. नवीन अपडेट केवळ आयफोन 11 आणि त्यावरील नवीन मॉडेल्ससाठी रोल आऊट करण्यात आले आहे. यूजर्सना नव्या अपडेटमध्ये कोणते फीचर्स मिळणार आहेत, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple has released iOS 26.5 🔥 pic.twitter.com/UYVdsVJTqR — Beta Profiles (@BetaProfiles) May 11, 2026
कंपनीने जारी केलेल्या नव्या अपडेटमध्ये खास आरसीएस मेसेजिंगसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सपोर्ट देण्यात आला आहे. या नव्या अपडेटमुळे आता आयफोन आणि अँड्रॉईड यांच्यामधील चॅट्स अधिक सुरक्षित राहणार आहेत. यापूर्वी आरसीएस मेसेज एन्क्रिप्टेड नव्हते. ज्यामुळे हे चॅट्स तिसऱ्या व्यक्तींकडून अडवले जाण्याचा धोका होता.
अॅपलने सुमारे 13 वर्षांनंतर त्यांच्या मॅप्स अॅपमध्ये जाहिराती जोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता व्यवसाय ॲपल मॅप्समधील प्रमोटेड लिस्टिंगद्वारे नकाशावर त्यांची दुकाने किंवा सेवा प्रदर्शित करू शकतील. इतकंच नाही तर मॅपमध्ये नवीन सजेस्टेड प्लेस नावाचे फीचर जोडण्यात आले आहे. जे यूजर्सना जवळपासच्या लोकप्रिय रेस्टॉरंट्स, दुकाने आणि पर्यटन स्थळांबद्दल माहिती देईल.
नव्या अपडेटनंतर आता मॅजिक माऊस आणि मॅजिक किबोर्ड सारख्या अॅपल ॲक्सेसरीज आता यूएसबी-सीद्वारे आयफोनला जोडणं आता सहज शक्य होणार आहे. एकदा तुम्ही या ॲक्सेसरीज डिव्हाईसला जोडल्या की त्या ब्लूटूथद्वारे काम करणार आहेत.
जे यूजर्स आयफोनवरून अँड्रॉईडवर स्विच करत आहे, अशा यूजर्ससाठी देखील नवीन अपडेट अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आता तुम्ही तुमच्या अँड्रॉइड डिव्हाइसवर कोणते मेसेज अटॅचमेंट्स ट्रान्सफर करायचे आहेत, हे निवडू शकाल.
कंपनीने नव्या अपडेटमध्ये नवीन प्राइड ल्युमिनन्स वॉलपेपर देखील जोडले आहे. हे पूर्णपणे कस्टमाइजेबल आहे आणि यूजर्स 12 वेगवेगळ्या रंगांसह त्यांच्या आवडीनुसार याची निवड करू शकणार आहेत.
Ans: हे अपडेट iPhone 11 आणि त्यावरील नवीन मॉडेल्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे.
Ans: सेटिंग > जनरल> सॉफ्टवेअर अपडेटमध्ये जाऊन तुम्ही हे अपडेट डाउनलोड आणि इंस्टॉल करू शकता.
Ans: नव्या अपडेटमध्ये RCS Chats साठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सपोर्ट देण्यात आला आहे, ज्यामुळे चॅट्स अधिक सुरक्षित राहतील.






