Samsung चा मोठा निर्णय! ‘या’ 6 बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत 3,000 रुपयांपर्यंत वाढ, ग्राहकांना बसला धक्का
सॅमसंगने गेल्यावर्षी लाँच केलेल्या गॅलेक्सी M36 आणि गॅलेक्सी F36 स्मार्टफोनच्या किंमतीत 1,500 रुपयांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, गॅलेक्सी M17 आणि Galaxy F17 ची किंमत 1,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, गॅलेक्सी A17 च्या किंमतीत 3 हजार रुपयांची आणि गॅलेक्सी A06 च्या किंमतीत 1,500 रुपयांची वाढ केली आहे. टिप्स्टर अभिषेक यादवने त्यांच्या एक्स अकाऊंटवर याबाबत माहिती देत पोस्ट शेअर केली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंग गॅलेक्सी M36 5G चे 8GB + 128GB व्हेरिअंट 21,499 रुपयांत लाँच करण्यात आले होते. मात्र आता या व्हेरिअंटची किंमत 500 रुपयांनी वाढली असून नवीन किंमत स्मार्टफोन 21,999 रुपये झाली आहे. स्मार्टफोनच्या 8GB + 256GB या व्हेरिअंटची लाँच किंमत 24,499 रुपये होती. मात्र आता ही किंमत 1,500 रुपयांनी वाढली असून नवीन किंमत 25,999 रुपये झाली आहे.
2026 is not a good year for the smartphone industry. 🥲 Samsung smartphones getting a price hike in India 🇮🇳 New prices effective March 5, 2026. Also hearing that OPPO A6 Pro, A6x, and Reno 15C could see a price hike soon. Samsung revised prices:
• Galaxy M36 (8/128GB) –… pic.twitter.com/HlWpW3CDVo — Abhishek Yadav (@yabhishekhd) March 5, 2026
सॅमसंग गॅलेक्सी F36 5G च्या 8GB +128GB व्हेरिअंटची लाँच किंमत 21,499 रुपये आहे. मात्र आता ही किंमत 500 रुपयांनी वाढली असून स्मार्टफोन 21,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर 8GB + 256GB व्हेरिअंटची लाँच किंमत 24,999 रुपये होती. मात्र आता ही किंमत 1,500 रुपयांनी वाढली असून नवीन किंमत 25,999 रुपये झाली आहे. सॅमसंग गॅलेक्सी A06 5G स्मार्टफोनच्या 6GB + 128GB व्हेरिअंटची लाँच किंमत 15,499 रुपये होती. मात्र कंपनीने ही किंमत 500 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला असून नवीन किंमत 15,999 रुपये झाली आहे.
सॅमसंग गॅलेक्सी M17 5G चे 6GB + 128GB व्हेरिअंट आता 15,999 रुपयांऐवजी 16,499 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. ही किंमत 500 रुपयांनी वाढली आहे. तर 8GB + 128GB ची किंमत देखील 1 हजार रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता हा व्हेरिअंट 17,499 रुपयांऐवजी 18,499 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी F17 5G चे 4GB + 128GB व्हेरिअंट 16,499 रुपयांत लाँच करण्यात आले होते. मात्र आता या व्हेरिअंटची किंमत 500 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता हे स्मार्टफोन व्हेरिअंट 16,999 रुपयांत खरेदी केले जाऊ शकते. 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 1,000 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता हे व्हेरिअंट 17,999 रुपयांऐवजी 18,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. 8GB + 128GB व्हेरिअंट 19,999 रुपयांत लाँच करण्यात आले होताे. मात्र आता ही किंमत 1 हजार रुपयांनी वाढली असून डिव्हाईस 20,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी A17 5G स्मार्टफोनचे 6GB + 128GB व्हेरिअंंट 18,999 रुपयांत लाँच करण्यात आले होते. मात्र आता या व्हेरिअंटची किंमत 1,500 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे हे व्हेरिअंट आता 20,499 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. 8GB + 128GB व्हेरिअंंट 20,499 रुपयांत लाँच करण्यात आले होते. मात्र आता या व्हेरिअंटची किंमत 2,000 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे हे व्हेरिअंट आता 22,499 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. 8GB + 256GB व्हेरिअंंट 23,499 रुपयांत लाँच करण्यात आले होते. मात्र आता या व्हेरिअंटची किंमत 3,000 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे हे व्हेरिअंट आता 26,499 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.






