आता तुमचा पासपोर्ट होणार हाईटेक! भारतात सुरु झाली ई-पासपोर्ट सर्विस, काय आहेत फायदे? जाणून घ्या
भारताबाहेर प्रवास करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पासपोर्ट. पासपोर्टशिवाय तुम्ही कोणत्याही देशात जाऊ शकत नाही. पासपोर्ट तयार करण्यासाठी फॉलो करावी लागणारी प्रोसेस थोडी किचकट आहे, त्यामुळे बरेचं लोकं असे आहेत की जे ही प्रोसेस फॉलो करावी लागू नये म्हणून पासपोर्ट बनवतच नाही. पण आता तुम्हाला ही किचकट प्रोसेस फॉलो करण्याची गरज नाही. कारण तुम्ही ई पासपोर्टसाठी अर्ज करू शकता. अॅडवांस टेक्नोलॉजीवाल्या ई-पासपोर्टचे बरेच फायदे आहेत.
भारत सरकारने तंत्रज्ञान क्षेत्रात आतापर्यंत अनेक बदल केले आहेत. यानंतर आता एक नवीन निर्णय घेत ई पासपोर्टची सेवा सुरु करण्यात आली आहे. ई पासपोर्टमुळे प्रवाशांची ओळख सुरक्षित राहणार आहे, शिवाय इंटरनॅशनल प्रवासात देखील मदत मिळणार आहे. पण हे ई-पासपोर्ट नक्की आहे, त्याच्यासाठी कशा प्रकारे अर्ज केला जाऊ शकतो, याबद्दल आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
ई-पासपोर्ट दिसायला पारंपारिक पासपोर्ट प्रमाणेच असतो, परंतु यामध्ये एक खास माइक्रोचिप लावलेली असते. या चिपमध्ये तुमची वैयक्तिक माहिती, तसेच बायोमेट्रिक डिटेल्स देखील सेव्ह केलेल्या असतात. जसं की फोटो, फिंगरप्रिंट इत्यादी. हा संपूर्ण डेटा सुरक्षित पद्धतीने एन्क्रिप्टेड असतो. हा डेटा केवळ अधिकृत स्कॅनिंग सिस्टमद्वारेच वाचला जाऊ शकतो.
भारताच्या काही निवडक शहरांमध्ये सध्या ई-पासपोर्ट सेवा सुरु करण्यात आली आहे. या शहरांमध्ये नागपुर, चेन्नई, जयपुर, दिल्ली, हैदराबाद, रांची, शिमला, भुवनेश्वर, गोवा आणि जम्मू इत्यादींचा समावेश आहे. परराष्ट्र मंत्रालयाची योजना आहे की, 2025 च्या मध्यापर्यंत ही सेवा संपूर्ण देशात लागू केली जाणार आहे. ज्यामुळे प्रत्येक भारतीयाला सरकारने सुरु केलेल्या या सर्विसचा फायदा मिळू शकणार आहे.
अधिक चांगली सुरक्षा: या पासपोर्टमधील चिप खोटी बनवणं किंवा त्याच्यासोबत काही गैरप्रकार करणं अशक्य आहे.
फास्ट इमिग्रेशन: इंटरनेशनल एयरपोर्ट्सवर जेव्हा तुम्ही इमिग्रेशन प्रोसेसमधून जाता, तेव्हा तेथील अधिकाऱ्यांना या चिपच्या मदतीने तुमची माहिती त्वरित मिळते. यामुळे वेरिफिकेशनच्या वेळेची बचत होते.
डेटा सुरक्षित: चिपमध्ये साठण्यात आलेली माहिती पब्लिक की इंफ्रास्ट्रक्चर (PKI) टेक्नोलॉजीच्या मदतीने सुरक्षित ठेवली जाते. म्हणजेच ही माहिती कोणताही अनोळखी व्यक्ति अॅक्सेस करू शकत नाही.
ज्यांच्याकडे पहिल्यापासूनच पारंपरिक पासपोर्ट आहे, त्यांना लगेचच नवीन ई-पासपोर्टसाठी अप्लाय करण्याची गरज नाही.