प्रेमानंद महाराज झाले AI चे शिकार, फेक व्हिडीओ पाहून लोकांचा विश्वासचं बसेना... स्वत: पोस्ट करत दिली माहिती
सध्याच्या डिजीटल जगात AI ने सर्वत्र त्याची ओळख निर्माण केली आहे. जी कामं पूर्वी स्वत: विचार करून केली जात होती. आज याच सर्व कामांसाठी AI चा वापर केला जात आहे. AI सर्वच कामांत कुशल आहे. AI लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच त्यांच्या कामात मदत करत असतो. AI आपल्याला कधी असाईंटमेंट पूर्ण करण्यासाठी मदत करतो तर कधी आपल्या ऑफीसची कामं पूर्ण करण्यासाठी मदत करतो. थोडक्यात सांगायचं झालं तर AI आपली कामं सोपी करतो आणि आपल्या डोक्यावरचा भार हलका करतो.
AI जेवढा चांगल्या कामासाठी वापरला जातो, तेवढेच त्याचे दुष्परिणाम देखील आहेत. AI च्या मदतीने तुम्ही दुसऱ्यांना त्रास देऊ शकता, त्यांचे फेक व्हिडीओ तयार करू शकता, त्यांचा खोटा आवाज तयार करू शकता. असे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. अनेकदा AI च्या मदतीने तयार केलेले व्हिडीओ इतके खरे वाटतात की त्यांच्यातील फरक ओळखणं देखील कठीण होऊन जातं. आता देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ प्रेमानंद महाराज यांचा आहे. हा व्हिडीओ AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
आता प्रेमानंद महाराज यांचा AI व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या AI व्हिडीओमध्ये प्रेमानंद महाराज अस्खलितपणे इंग्रजी बोलताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून लोकांचा विश्वासच बसत नाही आहे. कारण सर्वांना माहित आहे की प्रेमानंद महाराज यांना इंग्रजीत फक्त काहीच गोष्टी समजतात. पण या व्हायरल झालेल्या AI व्हिडीओची लोकांनी प्रशंसा केली आहे.
AI ने पहिल्यांदाच काहितरी चांगलं काम केलं आहे, असं लोकं म्हणत आहे. पण प्रेमानंद महाराज यांच्या काही अनुयायांना हा व्हिडिओ आवडला असला तरी, काहींचे म्हणणे आहे की हे करू नये. या व्हिडिओबाबत प्रेमानंद महाराज यांनी एक नोट जारी केली आहे. त्यांची त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये सांगण्यात आलं आहे की, AI चा चुकीचा वापर करू नये.
राधे राधे ! श्री हरिवंश !
सूचना
आप सभी को सूचित व सावधान करना है कि वर्तमान में कई लोग पूज्य गुरुदेव श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज की वाणी व उपदेशों को Artificial Intelligence (AI) के माध्यम से अन्य भाषाओं में परिवर्तित करके या मनमाने ढंग से प्रस्तुत कर Social Media… pic.twitter.com/RVFWX2zn5f— Bhajan Marg (@RadhaKeliKunj) April 6, 2025
प्रेमानंद महाराज यांचा AI व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे की, राधे राधे ! श्री हरिवंश ! तुम्हा सर्वांना माहिती आणि सावधगिरी बाळगावी लागेल की सध्या बरेच लोक आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) च्या मदतीने पूज्य गुरुदेव श्री हित प्रेमानंद गोविंद शरण जी महाराज यांचे शब्द आणि शिकवण इतर भाषांमध्ये रूपांतरित करत आहेत किंवा मनमानी पद्धतीने सादर करत आहेत आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आहेत, जे पूर्णपणे शिष्टाचार आणि कायद्याच्या विरुद्ध आहे. म्हणूनच, मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की पूज्य महाराज जी यांच्या शब्दांची प्रतिष्ठा त्यांच्या मूळ भाषेच्या शैलीतच राहावी, म्हणून कोणीही एआय वापरून असे व्हिडिओ बनवू नयेत किंवा त्यांचे समर्थन करू नये किंवा ते कुठेही शेअर करू नये.