Vivo ने उडवली इतर कंपन्यांची झोप! स्वस्त किंमतीत लाँच केला पॉवरफुल Smartphone, असे आहेत खास फिचर्स
टेक कंपनी Vivo ने त्यांचा नवीन स्मार्टफोन Vivo T4 5G मंगळवारी 22 एप्रिल रोजी भारतात लाँच केला आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या लाँचिंगने इतर कंपन्यांची झोप उडवली आहे. कारण हा स्मार्टफोन छोटा पॅकेट बडा धमाका आहे. विवोने लाँच केलेला हा स्मार्टफोन एक बजेट व्हेरिअंट आहे. स्मार्टफोनची किंमत कमी असली तरी देखील यामध्ये अनेक तगडे फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने नवीन स्मार्टफोन Snapdragon 7s Gen 3 चिपसेट, 12GB पर्यंत रॅम आणि 7,300mAh बॅटरीसह लाँच केला आहे.
iPhone 17 च्या डिझाइनवरून उठला पडदा, First Look पाहून तुम्हीही प्रेमात पडाल! एक्सवर video viral
स्मार्टफोनची किंमत बजेटमध्ये आहे. म्हणजेच जर तुम्ही तगड्या फीचर्ससह नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा नवीन स्मार्टफोन तुमच्यासाठी बेस्ट आहे. या स्मार्टफोनची विक्री 29 एप्रिलपासून सुरु होणार आहे. तुम्ही हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, वीवो इंडिया ई-स्टोर आणि निवडक ऑफलाइन रिटेल स्टोरवरून खरेदी करू शकता. या स्मार्टफोनच्या पहिल्या विक्रीवर कोणत्या ऑफर्स दिल्या जाणार आहेत, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
भारतात Vivo T4 5G स्मार्टफोन 8GB + 128GB, 8GB + 256GB आणि 12GB + 256GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 23,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 25,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन भारतात एमरल्ड ब्लेज आणि फँटम ग्रे कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Vivo T4 5G मध्ये 6.77 इंचाचा फुल-एचडी+ (1,080 x 2,392 पिक्सेल) AMOLED क्वाड-कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे आणि त्याची लोकल पीक ब्राइटनेस 5,000 निट्सपर्यंत आहे.
Welcome to the Turbo life. Level up on multitasking, last beyond the day, slay with your display, and get clear reels in 4K, with the one and only vivo T4.
Sale starts on 29th april.
Know more https://t.co/pZQXjK1JQc#vivoT4 #TurboLife #GetSetTurbo pic.twitter.com/wTl8Z3yDHU— vivo India (@Vivo_India) April 22, 2025
फोनमध्ये 4nm ऑक्टा-कोर Snapdragon 7s Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याला 12GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन 15-बेस्ड Funtouch OS 15 वर आधारित आहे.
फोटोग्राफीसाठी, Vivo T4 5G मध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) आणि f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सलचा प्रायमरी रियर सेंसर आणि f/2.4 अपर्चरवाला 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी सेंसर देण्यात आला आहे. फ्रंटला f/2.0 अपर्चरसह 8-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
Vivo T4 5G मध्ये 7,300mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड फ्लॅशचार्जसह रिवर्स आणि बाईपास चार्जिंगला देखील सपोर्ट करते.
हँडसेटमघ्ये सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. यामध्ये IP65 डस्ट आणि स्प्लॅश रेजिस्टेंस रेटिंग आहे. कनेक्टिविटी ऑप्शन्समध्ये 5G, 4G, वाय-फाय, ब्लूटूथ 5.2, GPS, OTG आणि USB टाइप-C पोर्ट देखील देण्यात आला आहे. एमराल्ड ब्लेज व्हेरिअंटचे मेजरमेंट 163.40 x 76.40 x 7.89 मिमी आहे.