Free Fire MAX: निशाणा होईल एकदम अचूक! गेममध्ये अशी ठेवा सेन्सिटिव्हिटी सेटिंग, जाणून घ्या
विशलिस्ट तयार केली का? ‘या’ महिन्यात सुरु होणार Amazon Prime Day Sale… या यूजर्सना होणार मोठा फायदा
सेन्सिटीविटी याचा अर्थ असा आहे की तुमच्या स्क्रीनवर हालचाल किती वेगाने आणि किंवा किती हळुवार होते. जर सेन्सिटिव्हिटी जास्त असेल तर स्क्रीनवरील हालचाल अतिशय वेगाने होऊ शकते. मात्र जग सेन्सिटिव्हिटी कमी असेल तर हालचाल देखील स्लो होते. (फोटो सौजन्य – Pinterest) (
यामध्ये संपूर्ण स्क्रीनवरील हालचालींना कंट्रोल केले जाते. जग तुम्हाला वेगवान हालचाली पाहिजे असतील तर तुम्हालाही सेटिंग उच्च स्तरावर ठेवावी लागेल. नवीन प्लेअरसाठी सेटिंग 80 ते 100 दरम्यान असणं योग्य आहे.
जवळून शत्रूवर निशाणा साधण्यासाठी ही सेटिंग अतिशय फायद्याची ठरते. रेड डॉट स्कोप्स वापरताना निशाणा या सेटिंगच्या मदतीने कंट्रोल केला जातो. सेटिंग 70 ते 90 दरम्यान असल्यास फायदा होऊ शकतो.
मध्यम अंतराच्या लढाईसाठी वापरले जाते. जर ही सेटिंग जास्त उच्चस्तरावर सेट केलेली असेल तर निशाणा कंट्रोल करणे अतिशय कठीण होते. सेटिंग 60 ते 80 दरम्यान सेट करा.
जास्त अंतरावरील लढाईसाठी ही सेटिंग अगदीची असते. याची रेंज थोडी कमी असेल तर फायदा होऊ शकतो. ही सेटिंग 50 ते 70 दरम्यान सेट करा.
स्निपर बंदुकीसाठी या सेटिंगचा वापर केला जातो. स्निपरमध्ये अचूकता सर्वात गरजेची असते. यामुळे ही सेटिंग 30 ते 50 दरम्यान सेट करा.
याचा वापर तुमच्या आजूबाजूला पाहण्यासाठी केला जातो. ही सेटिंग 70 ते 90 दरम्यान सेट करा.






