Free Fire MAX vs PUBG Mobile: कोणता गेम आहे खरा किंग? गेमप्ले, ग्राफिक्स आणि परफॉर्मन्समधील फरक जाणून घ्या
सर्वात आधी गेमप्ले आणि ड्युरेशन याबाबत जाणून घेऊया. फ्री फायर मॅक्स मध्ये एक मॅच सुमारे दहा ते पंधरा मिनिटांची असते. तर पबजी मोबाईलमधील एक मॅच सुमारे 20 ते 30 मिनिटांपर्यंत सुरू असते. जर तुम्हाला कमी वेळात जास्त आणि वेगवान खेळाचा अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही फ्री फायर मॅक्सची निवड करू शकता. पण तुम्हाला दीर्घकाळ आणि रियलॅस्टिक मॅच खेळण्यात आनंद मिळत असेल तर पबजी मोबाईल तुमच्यासाठी बेस्ट आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
पबजी मोबाईल त्यांच्या रियलॅस्टिक ग्राफिकसाठी ओळखला जातो. यामध्ये नकाशे, बंदुकी आणि कॅरेक्टर अत्यंत खरे वाटतात. फ्री फायर मॅक्समधील ग्राफिक्स थोडे कलरफुल आणि थोडे ॲनिमेटेड स्टाईल असतात. कमी रॅम असलेल्या फोनमध्ये देखील फ्री फायर मॅक्स अतिशय स्मूथ चालतो. मात्र पबजी मोबाईल खेळण्यासाठी पावरफुल डिव्हाईस गरजेचे असते.
दोन्ही गेम्समधील कंट्रोल आणि अडथळे वेगवेगळे आहेत. फ्री फायर मॅक्स नवख्या खेळाडूंसाठी अतिशय चांगला गेम मानला जातो. याचा गेमप्ले अतिशय साधा आहे आणि नवीन प्लेयर हा गेम अतिशय जलद शिकू शकतात. पबजी मोबाईल थोडा आव्हानात्मक आहे. कारण यामध्ये रिकॉइल कंट्रोल, निशाणा साधनं आणि स्ट्रॅटेजी जास्त महत्त्वाची असते.
फ्री फायर मॅक्स मध्ये प्रत्येक कॅरेक्टरची एक वेगळी शक्ती असते. ज्यामुळे गेम युनिक बनतो. पबजी मोबाईलमध्ये अशी सिस्टीम नाही.
हा देखील एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. फ्री फायर मॅक्सचा आकार पबजी मोबाईलच्या तुलनेत कमी असतो आणि लो स्टोरेज असलेल्या फोनमध्ये देखील फ्री फायर मॅक्स अगदी सहज खेळला जाऊ शकतो. मात्र पबजी मोबाईलचा आकार मोठा असतो. त्यामुळे स्मूथ गेमप्ले अनुभव पाहिजे असेल तर तुम्हाला हाय एंड डिव्हाईसची गरज असते.
विशलिस्ट तयार केली का? ‘या’ महिन्यात सुरु होणार Amazon Prime Day Sale… या यूजर्सना होणार मोठा फायदा
कम्युनिटी आणि ई-स्पोर्ट्सबद्दल बोलायचं झालं तर, दोन्ही गेम्सचा खेळाडू वर्ग मोठा आहे. ई-स्पोर्ट्समध्ये पबजी मोबाईल अधिक लोकप्रिय आहे, पण फ्री फायर मॅक्सची लोकप्रियता सुद्धा वेगाने वाढत आहे.






