Census 2027: लॉगिनपासून घराच्या लोकेशनपर्यंत... ऑनलाईन असा भरा जनगणना फॉर्म, स्टेप-बाय-स्टेप वाचा संपूर्ण प्रोसेस
Census 2027: सावधान! जनगणनेच्या नावाखाली तुमचीही होऊ शकते फसवणूक… चुकूनही शेअर करू नका ही माहिती
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागू शकतो. तसेच केवळ घरमालकच नाही तर भाडेकरू देखील त्यांची माहिती स्वत: भरू शकणार आहेत. यामुळे वेळेची बचत होणार आहे. तसेच चुकीचा डेटा शेअर होण्याची शक्यता देखील कमी होते. जनगणना 2027 साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण प्रोसेस आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – AI Created)
ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी सर्वात आधी ऑफिशियल पोर्टल https://se.census.gov.in ला भेट द्या. इथे तुमची माहिती देऊन लॉगिन करा. आता तुमचे सेक्टर निवडा आणि कॅप्चा एंटर करा. लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा वापर केल्यास अधिक चांगले रिझल्ट्स मिळू शकतात.
आता घरातील कुटुंबप्रमुखाचे नाव एंटर करा. हे नाव नंतर बदलू शकत नाही. आता मोबाईल नंबर लिहा.
हिंदी, इंग्रजी, बंगाली, तमिळ आणि उर्दू सह उपलब्ध असलेल्या 16 भाषांपैकी कोणतीही एक भाषा निवडा. आता मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी एंटर करा.
जिल्हे, परिसर, वस्त्या आणि जवळपासची महत्त्वाची ठिकाणे याबाबत माहिती भरा. इथे तुम्ही पिनकोड देखील शेअर करू शकता.
सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे तुम्हाला नशाकावर घराचे अचूक लोकेशन मार्क करावे लागणार आहे. यामुळे अधिकाऱ्यांना तुमचे क्षेत्र ओळखण्यासाठी मदत मिळणार आहे.
आता तुम्हाला घर आणि कुटूंबासंबंधित माहिती भरायची आहे. यामध्ये घराची स्थिती, खोल्यांची संख्या, कुटुंबातील सदस्यांची संख्या यासारखी इत्यादी माहिती समाविष्ट असणार आहे. यासोबतच पाणी, वीज, स्वच्छतागृह आणि स्वयंपाकघर यांसारख्या सुविधांची देखील माहिती भरावी लागणार आहे.
विशलिस्ट तयार केली का? ‘या’ महिन्यात सुरु होणार Amazon Prime Day Sale… या यूजर्सना होणार मोठा फायदा
फॉर्म भरल्यानंतर संपूर्ण माहिती तपासा. गरज असेल तर काही बदल किंवा ड्राफ्ट सेव्ह करा.
संपूर्ण माहिती योग्य असेल तर सबमिट करा. यानंतर तुम्हाला 11 अंकी एसई आईडी दिला जाईल. हा आयडी सेव्ह करून ठेवा.
जेव्हा जनगणना अधिकारी तुमच्या घरी येतील तेव्हा त्यांना एसई आईडी दाखवा. तुम्ही भरलेली माहिती जर योग्य असेल तर प्रक्रिया पूर्ण मानली जाईल. अन्यथा पुन्हा माहिती शेअ करावी लागणार आहे.






