लाँच डेट कन्फर्म! या दिवशी लाँच होणार Samsung चा सर्वात पातळ स्मार्टफोन, 'हे' असू शकतात खास फीचर्स
स्मार्टफोन कंपनी Samsung ने जानेवारीमध्ये Samsung Galaxy Unpacked 2025 चे आयोजन केले होते. कंपनीने या ईव्हेंटमध्ये काही गॅझेट्स आणि स्मार्टफोन लाँच केले होते. तर कंपनीने दोन आगामी स्मार्टफोनची घोषणा देखील केली होती. Samsung चा सर्वात पातळ स्मार्टफोन आणि ट्रीपल फोल्ड लवकरच लाँच केला जाणार असल्याची घोषणा कंपनीने या ईव्हेंटमध्ये केली होती.
कुठेही फिरायला जा आणि WhatsApp स्टेटस ठेवा! तुमच्या बॉसला समजणार देखील नाही, फक्त करा ही सेटिंग
Samsung च्या ट्रीपल फोल्ड स्मार्टफोनबाबत चर्चा सुरु असतानाच आता सर्वात पातळ फोनची लाँच डेट समोर आली आहे. Samsung च्या सर्वात पातळ स्मार्टफोन Samsung Galaxy S25 Edge स्मार्टफोनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण हा स्मार्टफोन आता लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. अलिकडच्या अहवालानुसार, कंपनी एप्रिलमध्ये हा सर्वात पातळ स्मार्टफोन लाँच करू शकते. याबद्दल बऱ्याच काळापासून अटकळ बांधली जात होती आणि कंपनीने जानेवारीमध्ये Galaxy S25 मालिकेच्या लाँचिंग दरम्यान या फोनची झलक दाखवली होती. त्यामुळे प्रत्येकाला या आगामी स्मार्टफोनबाबत प्रचंड उत्सुकता होती. (फोटो सौजन्य – Pinterest)
आता लवकरच या नव्या स्मार्टफोनचं अनावरण होणार आहे. लाँच डेट सोबतच स्मार्टफोनची काही अपेक्षित फीचर्स देखील समोर आली आहेत. कंपनीने ईव्हेंटमध्ये स्मार्टफोनची एक झलक सादर केली होती, त्यावरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की स्मार्टफोनचं डिझाईन काहीस हटके असणार आहे. फोटोमध्ये दिसत आहे की, आगामी स्मार्टफोनच्या मागील पॅनेलवर दोन कॅमेरे आहेत.
16 एप्रिल रोजी एक ईव्हेंट आयोजित केला जाईल, ज्यामध्ये हा फोन लाँच केला जाईल, असे सांगितले जात आहे, परंतु ग्राहकांना तो खरेदी करण्यासाठी थोडी वाट पहावी लागू शकते आणि त्याची विक्री मेपासून सुरू होईल. तथापि, कंपनीकडून अद्याप याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नााही नाही. सुरुवातीला कंपनी या स्मार्टफोनचे फक्त 40,000 युनिट्स तयार करेल. असा अंदाज लावला जात आहे की तो काळ्या, हलक्या निळ्या आणि चांदीच्या रंगाच्या पर्यायांमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
डमी युनिटवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की Samsung Galaxy S25 Edge ची रचना गॅलेक्सी S25 डिव्हाईससारखीच असेल, परंतु त्याची जाडी खूपच कमी असेल. अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की त्याची जाडी 5.84 मिमी असू शकते, जी Galaxy S25 पेक्षा खूपच कमी आहे. Galaxy S25 Edge पातळ असूनही, कंपनी कामगिरीशी तडजोड करणार नाही. लीक्सनुसार, यात अल्ट्रा-थिन बेझलसह 6.7 इंचाचा फ्लॅट डिस्प्ले, क्वालकॉमचा शक्तिशाली Snapdragon 8 Elite प्रोसेसर, 200 एमपी मुख्य कॅमेरा आणि 50MP टेलिफोटो लेन्स आणि 12GB RAM असू शकते. कंपनी यात 3,900mAh बॅटरी देऊ शकते. आतापर्यंत त्याच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लाइनअपमध्ये त्याच्या स्थानानुसार, त्याची किंमत 60,000 रुपयांपासून सुरू होऊ शकते.