फोटो सौजन्य - Social Media
सॅमसंगच्या माहितीनुसार, यंदाच्या Galaxy Unpacked मध्ये सादर होणारी डिव्हाइसेस कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट मिलाफ असतील. वापरकर्त्यांना अधिक वैयक्तिक, स्मार्ट आणि सहज अनुभव देण्यासाठी कंपनीने अनेक नवीन AI फीचर्स विकसित केली आहेत. दैनंदिन वापर अधिक सोपा, जलद आणि परिणामकारक बनवण्यावर कंपनीचा विशेष भर असून, AI युगासाठी नवे मानदंड प्रस्थापित करण्याचा तिचा प्रयत्न आहे.
या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:३० वाजता होणार आहे. Samsung.com, Samsung Newsroom India आणि सॅमसंगच्या अधिकृत YouTube चॅनेलवरून जगभरातील प्रेक्षकांना हा कार्यक्रम लाइव्ह पाहता येणार आहे. त्यामुळे भारतातील टेकप्रेमींनाही या भव्य लाँचिंगचा अनुभव घरबसल्या घेता येणार आहे.
दरम्यान, Galaxy Unpacked 2026 संदर्भातील आगामी टीझर्स, ट्रेलर्स, विशेष ऑफर्स आणि इतर अपडेट्स मिळवण्यासाठी ग्राहकांना सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नवीन फोल्डेबल स्मार्टफोन्स, AI-आधारित स्मार्ट अनुभव आणि भविष्यातील तंत्रज्ञानाची झलक पाहण्यासाठी जगभरातील ग्राहक आणि तंत्रज्ञानप्रेमींमध्ये या कार्यक्रमाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.






