JioHotstar वर IPL 2025 ची फायनल मॅच FREE मध्ये पहायची आहे? आत्ताच करा हा 'जुगाड'
आयपीलएल 2025 चा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे. दोन्ही टिम्सच्या फॅन्समध्ये जबरदस्त उत्साह पाहायला मिळत आहे. या मॅचच्या 80,000 हून अधिक तिकीटांची विक्री झाली असल्याचं सांगितलं जात आहे. पण तुम्ही या मॅचची तिकीट खरेदी करू शकत नसाल किंवा आजचा सामना पाहण्यासाठी स्टेडिअमवर जाऊ शकत नसाल तर काही हरकत नाही. तुम्ही घसरबसल्या तुमच्या मोबाईलवर हा क्रिकेट सामना पाहू शकता आणि तेही फ्रीमध्ये.
आयपीएल 2025 च्या सर्व मॅच JioHotstar अॅपवर लाईव्ह स्ट्रिम केल्या जाणार आहेत. हा अॅप Android आणि iPhone दोन्हींसाठी उपलब्ध आहे. खरं तर या अॅपवर मॅच पाहण्यासाठी सबस्क्रिप्शनची आवश्यकता असते. पण जर तुम्ही Jio किंवा Airtel यूजर असाल तर काही खास रिचार्ज प्लॅन्समध्ये तुम्हाला या अॅपचे सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये ऑफर केले जाणार आहे, त्यामुळे तुम्ही घरबसल्या फ्रीमध्ये मॅच पाहण्याचा आनंद घेऊ शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्ही जिओ युजर असाल तर काही निवडक रिचार्ज प्लॅन्सवर तुम्हाला JioHotstar सबस्क्रिप्शन फ्री दिलं जाणार आहे.
100 रुपयांचा डेटा प्लॅन– यामध्ये 5GB डेटा आणि 90 दिवसांसाठी JioHotstar अॅक्सेस दिला जातो. पण लक्षात ठेवा की हा डेटा ओनली प्लॅन आहे, ज्याचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बेस प्लॅन असणं गरजेचं आहे.
195 रुपयांचा क्रिकेट पॅक– क्रिकेट चाहत्यांसाठी खास बनवलेल्या या प्लॅनमध्ये 15GB डेटा ऑफर केला जातो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 90 दिवसांची आहे. या प्लॅनमध्ये जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे.
349 रुपयांचा रिचार्ज प्लॅन– या प्लॅनमध्ये युजर्सना रोज 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि 90 दिवसांसाठी JioHotstar अॅक्सेस दिला जातो.
जर तुम्ही Airtel युजर असाल तर काही निवडक रिचार्ज प्लॅन्सवर तुम्हाला JioHotstar सबस्क्रिप्शन फ्री दिलं जाणार आहे. या रिचार्ज प्लॅन्सबाबत जाणून घ्या
100 रुपयांचा डेटा प्लॅन– या प्लॅनमध्ये युजर्सना 5GB डेटा आणि 90 दिवसांसाठी JioHotstar अॅक्सेस दिला जातो. .
549 रुपयांचा प्लॅन– या प्लॅनमध्ये दररोज 3GB डेटा आणि 3 महिन्यांचे जिओहॉटस्टार सबस्क्रिप्शन दिले जाते. जर तुमचा फोन 5G ला सपोर्ट करतो आणि तुम्ही 5G क्षेत्रात असाल तर तुम्हाला अमर्यादित 5G डेटा देखील मिळेल.
डायमंड खर्च न करता मिळणार इमोट आणि लूट क्रेट, हे आहेत आजचे Free Fire Max Codes! आत्ताच करा Redeem