Tech Tips: पावसाळ्यात इन्व्हर्टर-बॅटरीची कशी कराल योग्य देखभाल? जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स
जर पावसाळ्यात इन्वर्टर, बॅटरी यांसारख्या वस्तूंची योग्य काळजी घेतली नाही, तर त्यांचा परफॉर्मंस खराब होऊ शकतो आणि दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागू शकतो. यासोबतच, बॅटरीचे बॅकअप देखील कमी होऊ शकते. पण जर तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि योग्य पद्धतीने इन्वर्टर आणि बॅटरीचा वापर केला तर बॅटरी बॅकअप मजबूत होऊ शकतो. पावसाळ्यात इन्वर्टर आणि बॅटरीची योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यायची, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – AI Created)
पावसाळ्यात हवेमध्ये आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे लक्षात ठेवा की, इन्वर्टर आणि बॅटरी नेहमी सुक्या आणि हवेशीर ठिकाणी ठेवा. ज्या ठिकाणी पावसाचे पाणी अगदी सहज पोहोचू शकते अशा ठिकाणी या वस्तू ठेऊ नका. अन्यथा त्यांच्या परफॉर्मंसवर परिणाम होऊ शकतो. जास्त आर्द्रतेमुळे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स डॅमेज होऊ शकतात आणि बॅटरीची फंक्शनॅलिटी देखील खराब होऊ शकते.
जर बॅटरीच्या टर्मिनलवर धूळ किंवा गंज जमा झाला असेल तर यामुळे चार्जिंगवर परिणाम होऊ शकतो. यामुळे वेळोवेळी टर्मिनलची योग्य पद्धतीने स्वच्छता करा आणि वायरिंग देखील वेळोवेळी तपासत राहा. जर एखाद्या ठिकाणी कनेक्शन ढिले झाले असेल किंवा कोणता दोष आढळला तर, ते त्वरित दुरुस्त करून घ्या. यामुळे शॉर्ट सर्किटसारख्या समस्यांचा धोकाही कमी होईल.
7,500mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले… नव्या Honor स्मार्टफोनने केली कमाल, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
जर तुमच्या घरात फ्लॅट प्लेट किंवा ट्यूबलर बॅटरी असेल तर त्यामधील डिस्टिल्ड पाण्याची पातळी नियमितपणे तपासा. गरज असल्यास केवळ डिस्टिल्ड वॉटरचा वापर करा. साध्या पाण्याचा वापर केल्यास बॅटरी खराब होण्याची शक्यता असते. मात्र, जर बॅटरी ‘मेंटेनन्स-फ्री’ (देखभालीची गरज नसलेली) असेल, तर तुम्हाला ही प्रक्रिया करण्याची आवश्यकता नाही.






