Tech Tips: Smart TV अपडेट करावा की नाही? काय सांगतात तज्ज्ञ? कसा होतो फायदा? जाणून घ्या
सध्याच्या काळात स्मार्ट टीव्ही लोकांची गरज बनली आहे. सेट टॉप बॉक्स किंवा डिश टीव्ही वापरण्यापेक्षा स्मार्ट टीव्हीसाठी लोक वाय-फायचा वापर करण्याला प्राधान्य देतात. याचे अनेक फायदे देखील मिळतात. शिवाय पैशांची देखील बचत होते. जर तुम्ही सेट टॉप बॉक्सचा वापर करत असाल तर तुम्हाला दर महिन्याला काही ठराविक पैसे खर्च करावे लागतात आणि या पैशांमध्ये केवळ तुमच्या टीव्हीचा खर्च भागतो. पण जर वायफायचा विचार केला तर तुम्ही एका वायफाय रिचार्जवर स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉप वापरू शकता.
स्मार्ट टीव्हीवर तुम्ही तुम्हाला हवे असलेल्या वेळी तुमची आवडते कार्यक्रम सिरीयल आणि शो बघू शकता. याशिवाय टीव्हीवर तुम्ही व्हिडिओ किंवा मोबाईल कनेक्ट करून गेम देखील खेळू शकता. त्यामुळे तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर गेम खेळण्याचा आनंद घेता येईल. सध्याच्या काळात स्मार्ट टीव्ही एक मल्टी फीचर डिवाइस बनले आहे. हे एक असं डिवाइस आहे की ते इंटरनेटच्या मदतीने अनेक सुविधा प्रदान करते. पण ज्याप्रमाणे आपला स्मार्टफोन लॅपटॉप आणि इतर डिवाइस अपडेट केले जातात त्याचप्रमाणे स्मार्ट टीव्ही अपडेट करणे देखील गरजेचे आहे. का याबाबत अनेक लोकांना माहिती नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
आपण दिवसभर स्मार्ट टीव्हीचा वापर करतो. काही वेळा स्मार्ट टीव्ही हँग होतो किंवा स्लो चालतो आणि अशावेळी काय करावे अनेकांना सुचत नाही. यावरील उपाय म्हणजे तुमच्या स्मार्ट टीव्ही वेळोवेळी अपडेट करणे. असे अनेक लोक असतात की त्यांचा स्मार्टफोन आणि लॅपटॉप वेळोवेळी अपडेट करतात. हे स्मार्ट टीव्हीच्या अपडेटकडे दुर्लक्ष करतात. यामुळे मोठं नुकसान सहन करावं लागतं. स्मार्ट टीव्ही अपडेट करण्याची अनेक फायदे आहेत. तशीच ही प्रोसेस देखील अगदी सोपी आहे. त्यामुळे तुम्ही अगदी काही क्षणात तुमचा स्मार्ट टीव्ही अपडेट करू शकता.
जसं जसं तंत्रज्ञान बदलत आहे अशाच कंपन्या देखील त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक बदल करत आहेत. ग्राहकांना चांगला अनुभव मिळावा हाच त्यामागील उद्देश आहे. मात्र जर तुम्ही या सर्वाकडे दुर्लक्ष करून तुमचा स्मार्ट टीव्ही वेळोवेळी अपडेट करत नसाल तर तुम्हाला मोठे नुकसान सहन करावं लागू शकतं. याशिवाय तुमचा टीव्ही लवकर खराब होण्याची शक्यता देखील निर्माण होते. कंपनीने जारी केलेल्या प्रत्येक अपडेटमध्ये काही ना काही बग्स फिक्स केले जातात आणि टीव्हीचा स्पीड देखील वाढवला जातो. ज्यामुळे तुमचा टीव्ही पूर्वीपेक्षा स्मूद आणि लॅग फ्री अनुभव देतो.
इंटरनेटद्वारे कनेक्ट केले जाणारे डिवाइस सहसा सायबर हल्ल्याचे शिकार होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुमचं स्मार्ट टीव्ही देखील डेटा चोरीच्या विळख्यात अडकू शकतो. कंपनीने जापी केलेले नवे अपडेट स्मार्ट टीव्हीची सुरक्षा वाढवतो आणि या डिवाइसची सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करते. अनेकदा नवीन फीचर जोडण्यासाठी कंपनी सॉफ्टवेअर अपडेट जारी करत असते. नवीन स्ट्रीमिंग अॅप्स, चांगले युजर इंटरफेस, स्क्रीन मिररिंगमध्ये सुधारणा, या सर्वामुळे युजरचा अनुभव अधिक चांगला होतो. अशा परिस्थितीत नवीन टीव्ही खरेदी न करता हे तुम्ही जुन्या टीव्हीमध्ये नवीन फीचरचा अनुभव घेऊ शकता.
नेटफ्लिक्स, यूट्यूब, अमेझॉन प्राइम सारखे स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म वेळोवेळी त्यांचे अॅप्स अपडेट करतात. जर तुमचा स्मार्ट टीव्ही जुने सॉफ्टवेअर वापरत असेल तरी काही ॲप्स योग्य विचार काम करत नाही. अशावेळी सॉफ्टवेअर अपडेट अत्यंत महत्त्वाचे ठरते. जुन्या टीव्ही सॉफ्टवेअरमुळे अनेकदा किरकोळ समस्या उद्भवतात, जसे की टीव्ही अचानक बंद होणे, वाय-फाय डिस्कनेक्ट होणे किंवा रिमोट योग्यरित्या काम करत नाही. या समस्या सॉफ्टवेअर अपडेटने दुरुस्त केल्या जाऊ शकतात.