• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Inauguration Of Ecinet An Integrated Digital Platform Election Commission

‘ईसीआयनेट’ या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन! निवणूक आयोग होणार अधिक पारदर्शक?

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी ‘ईसीआयनेट’ या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 22, 2026 | 06:30 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिकांचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने ‘ईसीआयनेट (ECINET)’ या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले आहे. इंडिया इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (IICDEM)-2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने हा महत्त्वाकांक्षी प्लॅटफॉर्म सादर करण्यात आला. २१ ते २३ जानेवारी २०२६ दरम्यान नवी दिल्लीतील भरत मंडपम येथे ही तीन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे.

ZP Election : महाबळेश्वर तालुक्यात उमेदवारी अर्जांचा महापूर; अखेरच्या दिवशी तब्बल…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संकल्पनेतून ‘ईसीआयनेट’ची निर्मिती करण्यात आली असून, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्या सहकार्याने हा प्रकल्प विकसित करण्यात आला आहे. या प्लॅटफॉर्मच्या विकासाची अधिकृत घोषणा मे २०२५ मध्ये करण्यात आली होती.

यावेळी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, ‘ईसीआयनेट’ हा प्लॅटफॉर्म भारतीय संविधान आणि निवडणूकविषयक कायद्यांच्या चौकटीत विकसित करण्यात आला आहे. तो २२ अनुसूचित भाषा तसेच इंग्रजीत उपलब्ध असून, नागरिकांसाठी अधिक सुलभ आणि समावेशक आहे. विविध देशांतील निवडणूक व्यवस्थापन संस्थांनी त्यांच्या स्थानिक कायदे आणि भाषांनुसार अशाच प्रकारचे डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यासाठी भारतासोबत सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू यांनी ‘ईसीआयनेट’मुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल, निर्णयप्रक्रिया जलद होईल आणि निवडणूक यंत्रणांवरील जनतेचा विश्वास अधिक मजबूत होईल, असे नमूद केले. तर निवडणूक आयुक्त डॉ. विवेक जोशी यांनी या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे तंत्रज्ञान आणि डिजिटल नवकल्पनांच्या क्षेत्रातील जागतिक सर्वोत्तम पद्धती समजून घेण्याची संधी निवडणूक संस्थांना मिळणार असल्याचे सांगितले.

माहिती तंत्रज्ञान विभागाच्या महासंचालक डॉ. सीमा खन्ना यांनी सादरीकरण करताना सायबर सुरक्षेला ‘ईसीआयनेट’चा मुख्य आधारस्तंभ असल्याचे स्पष्ट केले. आज तंत्रज्ञान केवळ सहाय्यक साधन न राहता धोरणात्मक सक्षमक बनले असून, या प्लॅटफॉर्ममुळे निवडणूक प्रक्रियेत विश्वासार्हता आणि कार्यक्षमता वाढेल, असे त्यांनी सांगितले.

‘ईसीआयनेट’ हा जगातील सर्वात मोठा निवडणूक सेवा डिजिटल प्लॅटफॉर्म मानला जात असून, भारत निवडणूक आयोगाच्या ४० हून अधिक अ‍ॅप्स आणि पोर्टल्सचे यामध्ये एकत्रीकरण करण्यात आले आहे. भारतीय संविधान, लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० व १९५१, मतदार नोंदणी नियम १९६० आणि निवडणूक आचार नियम १९६१ यांच्याशी पूर्ण सुसंगततेने हा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला आहे.

या प्रणालीद्वारे नागरिक, उमेदवार, राजकीय पक्ष आणि निवडणूक अधिकारी एकाच सुरक्षित डिजिटल व्यासपीठावर जोडले गेले आहेत. मतदार नोंदणी, मतदार यादी शोध, अर्जाची स्थिती तपासणे, उमेदवारांची माहिती, ई-ईपीआयसी डाउनलोड, बीएलओसोबत कॉल बुकिंग, मतदान प्रवृत्ती आणि तक्रार निवारण अशा विविध सेवा येथे उपलब्ध आहेत.

मराठी झेंडा रोविला! राष्ट्रीय ‘वीर गाथा 5.0’ स्पर्धेच्या महाराष्ट्रातील १९ विजेत्यांना कर्तव्य पथावर आमंत्रण

‘ईसीआयनेट’ची बीटा आवृत्ती २०२५ बिहार विधानसभा निवडणुका आणि विशेष सघन पुनरिक्षण प्रक्रियेदरम्यान यशस्वीपणे वापरण्यात आली होती. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवरून १० कोटींहून अधिक अर्जांवर प्रक्रिया करण्यात आली असून, दररोज सरासरी २.७ लाख अर्ज हाताळले जात आहेत. ११ लाखांहून अधिक बूथ लेव्हल ऑफिसर्स (बीएलओ) नोंदणीकृत असून, १५० कोटींहून अधिक दस्तऐवजांचे डिजिटायझेशन करण्यात आले असल्याची माहिती भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Web Title: Inauguration of ecinet an integrated digital platform election commission

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 22, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • BMC
  • BMC Election 2026

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : स्वीकृत नगरसेवक म्हणून गोपाळ भगत यांच्या नावाची चर्चा
1

Maharashtra Politics : स्वीकृत नगरसेवक म्हणून गोपाळ भगत यांच्या नावाची चर्चा

Maharashtra Mayor Reservation : महाराष्ट्रात महिलांचे वर्चस्व; २९ पैकी १५ महापालिकेवर ‘महिला राज’
2

Maharashtra Mayor Reservation : महाराष्ट्रात महिलांचे वर्चस्व; २९ पैकी १५ महापालिकेवर ‘महिला राज’

BMC Mayor Reservation : मुंबईवर कोण करणार ‘राज’? आरक्षण जाहीर होताच ‘या’ महिला नेत्यांची रंगली चर्चा
3

BMC Mayor Reservation : मुंबईवर कोण करणार ‘राज’? आरक्षण जाहीर होताच ‘या’ महिला नेत्यांची रंगली चर्चा

BMC Mayor Reservation : आरक्षण सोडतीवरुन पेटलं रान! BMC आरक्षणावर शिवसेना ठाकरे गटाचा आक्षेप
4

BMC Mayor Reservation : आरक्षण सोडतीवरुन पेटलं रान! BMC आरक्षणावर शिवसेना ठाकरे गटाचा आक्षेप

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गोंधळलेलं, अपूर्ण पण सुंदर प्रेम,  ‘दो दीवाने सहर में’ चित्रपटातील पहिलं गाण रिलीज, ‘आसमा’मधून मिळणार प्रेमाचा नवा अनुभव

गोंधळलेलं, अपूर्ण पण सुंदर प्रेम, ‘दो दीवाने सहर में’ चित्रपटातील पहिलं गाण रिलीज, ‘आसमा’मधून मिळणार प्रेमाचा नवा अनुभव

Jan 22, 2026 | 06:30 PM
‘ईसीआयनेट’ या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन! निवणूक आयोग होणार अधिक पारदर्शक?

‘ईसीआयनेट’ या एकात्मिक डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन! निवणूक आयोग होणार अधिक पारदर्शक?

Jan 22, 2026 | 06:29 PM
थायलंडमध्ये १६ भारतीयांना बनवलं ‘गुलाम’; १८-२० तास अमानुष छळ, ओवैसींचे परराष्ट्र मंत्रालयाला सुटकेसाठी साकडं

थायलंडमध्ये १६ भारतीयांना बनवलं ‘गुलाम’; १८-२० तास अमानुष छळ, ओवैसींचे परराष्ट्र मंत्रालयाला सुटकेसाठी साकडं

Jan 22, 2026 | 06:22 PM
Maharashtra Politics: खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषदेत राजकीय घमासान; ‘या’ उमेदवारीमुळे चुरस वाढली

Maharashtra Politics: खडकी–देऊळगाव राजे जिल्हा परिषदेत राजकीय घमासान; ‘या’ उमेदवारीमुळे चुरस वाढली

Jan 22, 2026 | 06:22 PM
ट्रम्पच्या Gaza Board of Peace’ ला मोठा धक्का! चीन, ब्रिटन आणि फ्रान्सने फिरवली पाठ, जाणून घ्या भारताची भूमिका काय?

ट्रम्पच्या Gaza Board of Peace’ ला मोठा धक्का! चीन, ब्रिटन आणि फ्रान्सने फिरवली पाठ, जाणून घ्या भारताची भूमिका काय?

Jan 22, 2026 | 06:21 PM
Ahilyanagar News: शंकरराव गडाखांची स्वतंत्र खेळी सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची, नेवासेत राजकीय उलथापालथ अटळ?

Ahilyanagar News: शंकरराव गडाखांची स्वतंत्र खेळी सत्ताधाऱ्यांसाठी धोक्याची, नेवासेत राजकीय उलथापालथ अटळ?

Jan 22, 2026 | 06:21 PM
Sangali Election 2026 : महापालिका निवडणुकीत ‘नोटा’ चे बटन दाबून दर्शवली नाराजी; 31 हजार सांगलीकरांचा उमेदवारांना नकार

Sangali Election 2026 : महापालिका निवडणुकीत ‘नोटा’ चे बटन दाबून दर्शवली नाराजी; 31 हजार सांगलीकरांचा उमेदवारांना नकार

Jan 22, 2026 | 06:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Sindhudurg : जिल्हा परिषद निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु

Jan 22, 2026 | 05:45 PM
Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Parbhani : गुट्टे यांच्यामुळे भाजपाच्या निष्ठावंतांवर अन्याय, मधुसूदन केंद्रेंचा हल्लाबोल

Jan 22, 2026 | 05:35 PM
Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Mira Bhayander : भाईंदरमधील पाण्याच्या टाकीच्या बांधकामात पुन्हा अपघात, 6 महिन्यांत दुसरी दुर्घटना

Jan 22, 2026 | 05:31 PM
Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Navi Mumbai : नॉट रिचेबल नगरसेविका सरिता म्हस्के पहिल्यांदाच माध्यमांसमोर दिली प्रतिक्रिया

Jan 22, 2026 | 05:13 PM
BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

BMC Politics: महापौर आरक्षणावर घमासान, विरोधकांच्या आरोपात किती तथ्य?

Jan 22, 2026 | 05:05 PM
MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

MUMBAI : नगरसेविका सरिता म्हस्के यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Jan 22, 2026 | 03:20 PM
Sindhudurg : पावशी मतदारसंघातील महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ

Sindhudurg : पावशी मतदारसंघातील महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ

Jan 22, 2026 | 03:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.