भारतीय रेल्वेचा सुपरअॅप RailOne लाँच; तिकीट बुकिंगपासून PNR स्टेटसपर्यंत सर्वकाही क्षणात होणार
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक नवीन अॅप लाँच केले आहे. प्रवास अधिक सोपा आणि सुखाचा व्हावा, यासाठी हे नवं अॅप लाँच करण्यात आलं आहे. रेल्वेने लाँच केलेल्या या नव्या अॅपचं नाव RailOne आहे. हे एक सुपरअॅप आहे, जिथे प्रवाशांना तिकीट बुकिंगपासून PNR स्टेटसपर्यंत सर्व सुविधा मिळणार आहेत. हे अॅप प्रवाशांना अनेक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देते, ज्यामुळे वेगवेगळे अॅप्स डाऊनलोड करण्याची गरज भासत नाही. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सेंटर ऑफर रेलवे इन्फॉर्मेशन सिस्टम (CRIS) च्या 40 व्या स्थापना दिनानिमित्त हे सुपरअॅप लाँच केले आहे.
रेल्वेच्या नव्या सुपरअॅपमध्ये प्रवाशांना अनेक सुविधा ऑफर केल्या जाणार आहेत. जसं की, प्रवासी IRCTC कडून आरक्षित आणि अनारक्षित तिकिटे बुक करू शकतील. तसेच प्लॅटफॉर्म तिकिटे खरेदी करू शकतील. याशिवाय PNR स्टेटस आणि ट्रेन इन्क्वायरी देखील या अॅपद्वारे तपासू शकतील. हे अॅप प्रवाशांना कोचचे स्थान तसेच Rail Madad अॅपवर फीडबॅकचा पर्याय प्रदान करेल. त्यामुळे प्रवाशांची अनेक कामं अगदी क्षणात पूर्ण केली जाणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
RailOne ऐप लॉन्च: यात्री सेवाओं के लिए एकीकृत समाधान 📱🚆
रेल मंत्री @AshwiniVaishnaw ने इंडिया हैबिटैट सेंटर, नई दिल्ली में रेल सूचना प्रणाली केंद्र (CRIS) की 40वीं वर्षगांठ के अवसर पर नया ऐप RailOne लॉन्च किया।
💠 #RailOne एक समग्र और यूज़र-फ्रेंडली ऐप है, जो सभी प्रमुख… pic.twitter.com/UQ9B43bpEO
— पीआईबी हिंदी (@PIBHindi) July 1, 2025
भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी वन-स्टॉप प्लॅटफॉर्म या उद्देशाने हे नवीन अॅप विकसित केले आहे. यामध्ये प्रवाशांना गरज असलेल्या सर्व सुविधा ऑफर केल्या जात आहेत. हे अॅप अँड्रॉईड आणि आयफोन दोन्हीसाठी उपलब्ध आहे. शिवाय या एकाच अॅपमध्ये प्रवाशांना सर्व सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे कोणतेही दुसरे अॅप डाऊनलोड करण्याची गरज भासत नाही.
RailOne अॅपची खास गोष्ट म्हणजे, हे सिंगल साइन-ऑन फीचर ऑफर करते. म्हणजेच युजर्सना वेगवेगळे प्लॅटफॉर्म जसं की, RailConnect, Raill Madad, UTSonMobile किंवा R-Wallet साठी वेगवेगळे पासवर्ड एंटर करण्याची गरज भासत नाही. या अॅपमध्ये सर्व प्लॅटफॉर्म ऑफर केले जाणार आहे, पासवर्डशिवाय युजर्स त्याचा वापर करू शकणार आहेत. युजर्सना केवळ mPIN किंवा बायोमेट्रिकने लॉगिन करावं लागणार आहे.
चक्क मालकाचाच ChatGPT वर विश्वास नाही? Sam Altman च्या एका वाक्याने उडाली खळबळ; म्हणाल, AI टूलवर…
सध्या भारतीय रेल्वे प्रवाशांना वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या सुविधा ऑफर केल्या जातात. जसं की प्लॅटफॉर्म तिकीटसाठी रेल कनेक्ट अॅप, जेवण ऑर्डर करण्यासाठी IRCTC eCatering आणि फीड बॅकसाठी Rail Madad अॅप, अनरिसर्व तिकीटसाठी UTS आणि ट्रेन इन्क्वायरीसाठी National Train Enquiry प्लॅटफॉर्मचा वापर करावा लागतो.