iPhone 17 Air ची पहिली झलक Leak! एक्सवर शेअर केला व्हिडीओ, फोनची डिझाईन अशी की पाहून तुम्हीही प्रेमात पडाल
Apple च्या आगामी iPhone सीरीजबाबत सध्या चर्चा सुरु आहे. Apple युजर्स मोठ्या उत्साहाने आगामी सिरीजच्या लाँचिंगची वाट पाहत आहेत. iPhone 17 लाइनअपची लाँचिंग कधी होणार याबाबत अद्याप कंपनीने कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. मात्र हा फोन सप्टेंबरमध्ये लाँच करण्यात आला होता. iPhone 17 लाइनअपच्या लाँचिंगला अद्याप बराच काळ शिल्लक आहे. मात्र आता आगानी iPhone 17 लाइनअपचा एक व्हिडीओ समोर आला आहे. iPhone 17 लाइनअपच्या या व्हिडीओची सध्या चर्चा सुरु आहे.
नव्या अवतारात लाँच झाली OnePlus Nord सिरीज…पावरफुल बॅटरीसह मिळणार अनेक कमाल फीचर्स! किंमत केवळ इतकी
या व्हिडीओमध्ये आगामी iPhone 17 Air ची पहिली झलक दाखवण्यात आली आहे. फेमस टिप्स्टर Majin Bu ने एक हँड्स-ऑन व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तुम्हाला iPhone 17 Air ची पहिली झलक पाहायला मिळणार आहे. हा फोन मॅट ब्लॅक फिनिशमध्ये पाहायला मिळत आहे. फोनची डिझाईन आणि लूक दोन्ही क्लासी आहेत. अगदी कोणताही स्मार्टफोन युजर या आयफोनच्या प्रेमात पडाल, असा हा व्हिडीओ आहे. आतापर्यंतच्या सर्व मॉडेल्समध्ये हा iPhone 17 Air अत्यंत पातळ आणि हलका दिसत आहे. जर तुम्हाला आयफोन एका स्टायलिश, सिंपल आणि स्लीम लुकमध्ये पाहिजे असेल तर हे मॉडेल तुमच्यासाठी बेस्ट आहे. (फोटो सौजन्य – X)
iPhone 17 Air Black looks so good pic.twitter.com/ovOTNUKEg6
— Majin Bu (@MajinBuOfficial) July 8, 2025
एक्सवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कारण या आयफोनचे कॅमेरा डिझाईन इतर आयफोनपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. इतर आयफोनमध्ये दोन किंवा तीन कॅमेरे असतात तर iPhone 17 Air मध्ये एक सिंगल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे, जो एक फुल-वाइड कॅमेरा बारमध्ये फिट करण्यात आला आहे. आयफोनचे हे नवीन डिझाईन मिनिमलिस्ट आणि क्लीन लुक देतो. फोनचा मॅट ब्लॅक रंग अतिशय आकर्षक आहे. या फोनचा लूक अतिशय आकर्षक आहे.
याशिवाय असं देखील सांगितलं जात आहे की, iPhone 17 Air स्काय ब्लू रंगात देखील लाँच केला जाण्याची शक्यता आहे. हा रंग नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या M4 MacBook Air ने प्रेरित असणार आहे. ज्यांना आयफोन थोडा रंगीत आणि अनोखा लूक हवा आहे त्यांना हा नवीन रंग नक्कीच आवडेल.
एक्सवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दिसणारा आयफोन एक डमी मॉडेल आहे. म्हणजेच हे फायनल वर्जन नाही. पण यामुळे आपल्याला अॅपलच्या संभाव्य डिझाइन ट्रेंडची चांगली झलक पाहायला मिळते. जर अंतिम आवृत्तीही तशीच निघाली, तर हा फोन स्लिम, हलका आणि स्टायलिश आयफोन हवा असलेल्या यूजर्ससाठी खूप आकर्षक असेल.
आतापर्यंत आयफोनचे अनेक मॉडेल्स लाँच करण्यात आले आहेत. प्रत्येक मॉडेलची डिझाईन जवळपास एकसारखीच होती. त्यामुळे युजर्स प्रचंड वैतागले होते. आयफोन नव्या डिझाईनसह लाँच व्हावा, अशी युजर्सची अपेक्षा होती. आता युजर्सची ही अपेक्षा अखेर पूर्ण झाली आहे. कारण आगामी आयफोन एका नव्या डिझाईनसह लाँच करण्यात आला आहे. सहसा Apple सप्टेंबरमध्ये iPhones लाँच करते. त्यामुळे आता देखील अशी अपेक्षा आहे की, सप्टेंबर महिन्यात देखील आगामी आयफोन लाँच केला जाऊ शकतो. आधीपासूनच सर्वांना आगामी आयफोनबाबत सर्वांमध्येच प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओने ही उत्सुकता आणखी वाढवली आहे.