iQOO Neo 10 अखेर भारतात लाँच, 7000mAh बॅटरी आणि Snapdragon 8s Gen 4 ने सुसज्ज; वाचा किंमत आणि Features
iQOO चा नवीन स्मार्टफोन iQOO Neo 10 भारतात लाँच करण्यात आला आहे. लाँच करण्यात आलेल्या या नवीन डिव्हाईसमध्ये ऑल न्यू स्नॅपड्रॅगन 8s Gen 4 चिपसेट देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हीट डिसिपेशनसाठी स्मार्टफोनमध्ये 7,000mm स्क्वायर वेपर कूलिंग चेंबर देण्यात आला आहे. ज्यामुळे हा स्मार्टफोन अधिक खास बनतो.
50MP फ्रंट कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरीसह Xiaomi चा नवीन हँडसेट लाँच, असे आहेत स्पेशल फीचर्स
कंपनीने लाँच केलेले हे नवीन डिव्हाईस एक गेमिंग स्मार्टफोन आहे. कंपनीने दावा केला आहे की, नवीन डिव्हाईस या सेगमेंटमधील एकमात्र फोन आहे जो 144 fps गेमिंगला सपोर्ट करतो. एवढंच नाही तर या नवीन मॉडेलची चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या iQOO Neo 10 मॉडेलसोबत तुलना केली तर लक्षात येईल की यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. याच्या डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्समध्ये कंपनीने बदल केला आहे. (फोटो सौजन्य – X)
भारतात iQOO Neo 10 स्मार्टफोन चार व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB + 128GB, + 256GB, 12GB + 256GB आणि 16GB + 512GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 33,999 रुपये आणि 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 35,999 रुपये आहे. या स्मार्टफोनचा टॉप व्हेरिअंट 16GB + 512GB हा 40,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन इनफर्नो रेड आणि टाइटेनियम क्रोम रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. या हँडसेटची प्री बुकींग सुरु करण्यात आली आहे. 3 जूनपासून देशत Amazon आणि iQOO India ई-स्टोरद्वारे स्मार्टफोन खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.
🎮 Power through the game!
The #iQOONeo10 delivers up to 10hrs of Gaming at 90FPS*. Say goodbye to interruptions and hello to marathon sessions of pure adrenaline.
Pre-book now at just ₹29,999** on @amazonIN & https://t.co/bXttwlYQef and experience unstoppable power! ⚡🔥… pic.twitter.com/QZsEOGCDPa
— iQOO India (@IqooInd) May 27, 2025
iQOO Neo 10 च्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंच 1.5K AMOLED स्क्रीन देण्यात आली आहे. डिव्हाईसमध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 360Hz टच सँपलिंग रेट आणि 5,500 निट्सची पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे.
या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 4 SoC आणि एक डेडिकेटेड Q1 गेमिंग चिपसेट देण्यात आली आहे. ज्यामुळे डिव्हाईस अधित पावरफुल बनतं. या डिव्हाईसमध्ये 16GB पर्यंत LPDDR5X अल्ट्रा रॅम आणि 512GB तक UFS 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आलं आहे. डिव्हाईसमध्ये Android 15 बेस्ड FuntouchOS 15 देण्यात आला आहे.
फोनचा कॅमेरा देखील अत्यंत जबरदस्त आहे. डिव्हाईस डुअल रियर कॅमेरामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन सपोर्ट आणि f/1.79 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा Sony IMX882 प्रायमरी कॅमेरा ऑफर करतो. यासोबतच f/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी लवर्ससाठी डिव्हाईसमध्ये f/2.45 अपर्चर वाला 32-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. शिवाय, डिव्हाइसवरील पुढील आणि मागील दोन्ही कॅमेरे 60fps वर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग देतात.
iQOO Neo 10 मध्ये 120W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.