भूकंप आला? घाबरण्याची गरज नाही, आता हवेतच उडणार तुमचं घर! या देशातील नवीन तंत्रज्ञान
भूकंपाच्या घटना अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. भूकंपामुळे मोठं नुकसान होत असून लोकांचे जीव देखील जात आहेत. याच सर्व घटना लक्षात घेऊन जपानने एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले जात आहे जे आश्चर्यकारक आहे. जपानमध्ये असे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे, जे भूकंपासून लोकांचं संरक्षण करण्यासाठी मदत करणार आहे. जपानी कंपनी एअर डॅनशिनने एक विशेष तंत्रज्ञान विकसित केले आहे ज्याच्या मदतीने लोक भूकंपाच्या वेळीही सुरक्षित राहू शकतात.
आता PhonePe वरून करता येणार दुसऱ्यांसाठी पेमेंट, कंपनीने आणलं UPI Circle फीचर
कंपनीने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानाच्या मदतीने, भूकंपाच्या वेळी तुमचे घर हवेत म्हणजेच जमिनीपासून काही सेंटीमीटर वर येईल. अशा परिस्थितीत भूकंपाचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे घरातील सर्व नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी मदत होईल आणि यामुळे मोठं नुकसान टळणार आहे. ज्यावेळी भूकंप येईल, त्यावेळीच तुमचं घर हवेत उडणार आणि बाकीवेळी घर जमिनीवरच राहणार आहे. हे अनोखं तंत्रज्ञान लोकांसाठी प्रतंड फायद्याचं ठरणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सामान्य दिवसांमध्ये, हे तंत्रज्ञान घर जमिनीवर ठेवेल परंतु भूकंप होताच आणि पृथ्वी कंप पावताच, ते सक्रिय होईल आणि घर जमिनीपासून काही अंतरावर वर जाऊन हवेत थांबेल. या तंत्रज्ञानामध्ये, जेव्हा भूकंपामुळे पृथ्वी कंप पावते, तेव्हा ही प्रणाली एअरबॅगमधील हवा खूप वेगाने दाबण्यास सुरुवात करते, एअरबॅग्ज फुगतात आणि घर जमिनीपासून काही सेंटीमीटर वर येते, त्यामुळे घर कोसळण्याचा धोका टळतो आणि घरातील व्यक्तिंना इजा होत नाही आणि घरातील सामानाची हानी देखील होत नाही.
या तंत्रज्ञानाबद्दल एअर डॅनशिन सिस्टम्स इंकने दिलेल्या माहितीनुसार, ते घराला सुमारे 3 सेंटीमीटर उंचीवर घेऊन जाते. भूकंपानंतर फक्त 5 सेकंदात ही संपूर्ण प्रक्रिया घडते. जेव्हा भूकंपाचे कंपने थांबतात तेव्हा ते घराला लगेच जमिनीवर आणते.
Garena Free Fire MAX च्या आजच्या कोड्ससह प्लेअर्सना मिळणार आकर्षक रिवॉर्ड्स, अशा प्रकारे करा रिडीम
2021 मध्ये या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात आली, जी यशस्वी झाली. त्यावेळी काही घरांमध्ये ही प्रणाली बसवण्यात आली होती. 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला तेव्हा ही तंत्रे यशस्वीरित्या काम करत असल्याचे दिसून आले. ज्या घरांमध्ये हे तंत्र वापरले गेले तेथे कोणतेही नुकसान झाले नाही.
म्यानमारमध्ये नुकत्याच झालेल्या भूकंपाने संपूर्ण जग हादरले आहे. येथे हजारो लोकांनी आपले प्राण गमावले. जपानलाही भूकंपाचा सामना करावा लागू शकतो, असा दावाही करण्यात आला आहे. जपान सरकारने एक अहवाल जारी केला आहे ज्यामध्ये देशाला भूकंपाचा सामना करावा लागू शकतो असा इशारा देण्यात आला आहे. यामुळे त्सुनामी येऊ शकते ज्यामुळे मोठा विनाश होऊ शकतो. शेकडो इमारती कोसळू शकतात आणि अंदाजे 3,00,000 लोक मृत्युमुखी पडू शकतात.