COVID-19 चा पुन्हा भारतात धुमाकूळ; सुरक्षेसाठी तुमच्या बॅगेत असलेच पाहिजेत हे 'Gadgets'
भारतात कोविड 19 ने पुन्हा एकदा धुमाकुळ घातला आहे. भारतातील अॅक्टिव रुग्णांची संख्या 5,000 झाली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी सतर्क राहणं आवश्यक आहे. केवळ मास्क घालणं किंवा हात धुणे एवढंच पुरेस नाही. तर आपल्याकडे काही बेसिक मेडिकल गॅजेट्स असं देखील गरजेचं आहे.
या गॅजेट्सच्या मदतीने आपण वेळोवेळी आपल्या तब्बेतीची काळजी घेऊ शकतो. या गॅजेट्सच्या मदतीने आपण ब्लड प्रेशर, ऑक्सीजन लेवल, पल्स रेट आणि शुगर सारखे कोविड 19 चे महत्त्वाचे संकेत स्वतः तपासू शकतो. आता आम्ही तुम्हाला अशाच काही गॅझेट्सबद्दल सांगणार आहोत. हे गॅझेट्स केवळ कोविडच्या काळातच नाही, तर रोजच्या जिवनात देखील तुमची मदत करू शकतात. चला तर मग अशा काही उपयुक्त गॅझेट्सबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
या डिव्हाईसच्या मदतीने तुम्ही बॉडी टेम्परेचर तपासू शकता. हे डिव्हाईस ताप आला असल्यास अत्यंत उपयोगी ठरतो. मात्र हे डिव्हाईस खरेदी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
हे डिव्हाईस ब्लड प्रेशर आणि पल्स रेट मोजण्यासाठी अत्यंत फायद्याचं आहे. हाय किंवा लो बीपी असणाऱ्या रुग्णासाठी हे डिव्हाईस अत्यंत गरजेचं आहे. याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या ब्लड प्रेशर आणि पल्स रेट मोजू शकता.
हे एक छोटं आणि स्वस्त डिव्हाईस आहे. हे डिव्हाईस बोटात घालून ब्लड ऑक्सीजन लेवल आणि पल्स मोजतात. कोव्हिडच्या काळात ब्लड ऑक्सिजन लेवल कमी होणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं.
जर तुम्हाला डायबिटीज आहे तर हे डिव्हाईस तुमच्या कामाचं आहे. या गॅजेट्सच्या मदतीने तुम्ही घरबसल्या ब्लड शुगर लेवल मोजू शकता.
हे डिव्हाईस मोबाईल ॲपद्वारे जोडले जाते आणि दररोज ECG रेकॉर्ड करते.
हे डिव्हाईस वयोवृद्ध व्यक्तींसाठी अत्यंत उपयोगी आहे. अपात्कालीन परिस्थितीत केवळ एक बटन दाबून मदत मागितली जाऊ शकते, यासाठी फोन शोधण्याची देखील आवश्यकता नाही
जसे की हीटिंग पॅड, मसाजर्स किंवा नर्व्ह स्टिम्युलेटर अशी काही डिव्हाईस आहेत जी घरी वेदना कमी करू शकतात. परंतु हे देखील डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच निवडा.
या लेखात सांगण्यात आलेल्या सर्व डिव्हाईसच्या मदतीने, कोविडसारख्या संसर्गादरम्यान तुम्ही स्वतःची चांगली काळजी घेऊ शकालच, परंतु इतर आरोग्य समस्या देखील वेळेवर ओळखू शकाल आणि त्यावर उपचार करू शकाल. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे निरोगी राहणे, सतर्क राहणे आणि वेळोवेळी डॉक्टरांच्या संपर्कात राहणे अत्यंत गरजेचं आहे.