केवळ 5999 रुपयांच्या किंमतीत लाँच झाला Lava चा ब्रँड न्यू Smartphone, आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्सने सुसज्ज
Lava Bold N1 आणि Lava Bold N1 Pro हे दोन्ही स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आले आहेत. या स्मार्टफोनची विक्री जून महिन्यापासून सुरु होणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन कंपनीचे बजेट व्हेरिअंट आहेत. विक्री सुरु होताच ग्राहक कंपनीची ऑफिशियल वेबसाइट आणि अॅमेझॉन इंडियावरून या स्मार्टफोनची खरेदी करू शकतात. या स्मार्टफोनची डिझाईन अतिशय आकर्षक आहे. शिवाय फोनच्या किंमती देखील अत्यंत कमी आहेत. त्यामुळे कमी किंमतीत आकर्षक डिझाईन आणि तगड्या फीचर्सची मजा ग्राहकांना मिळणार आहे.
ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म अॅमेझॉन इंडियावर Lava Bold N1 आणि Lava Bold N1 Pro स्मार्टफोनसाठी स्पेशल मायक्रो साइट लाईव्ह झाली आहे. या साईटवर दिलेल्या माहितीनुसार, भारतात Lava Bold N1 ची विक्री 4 जूनपासून सुरु होणार आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 5999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर प्रो व्हेरिअंट म्हणजेच Lava Bold N1 Pro स्मार्टफोनची विक्री 2 जूनपासून सुरु होणार आहे. या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 6699 रुपये ठेवण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – X)
Lava Bold N1 स्मार्टफोन दोन रंग पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये रेडिअंट ब्लॅक आणि स्पार्कलिंग आवेरी यांचा समावेश आहे. तर प्रो व्हेरिअंट स्टील्थ ब्लॅक आणि टाइटेनियम ब्लॅक या कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
या स्मार्टफोनमध्ये 6.75-इंचचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. लावाच्या या फोनमध्ये AI-पावर्ड रियर कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच हा फोन IP54 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. Lava Bold N1 मध्ये ऑक्टा-कोर Unisoc प्रोसेसर असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. या फोनमध्ये 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आलं आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, या फोनमध्ये 8 जीबी वर्चुअल रॅमचा सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 10W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
Lava Bold N1 Pro स्मार्टफोन IP54-रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.67-इंच का HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. लावाच्या या फोनमध्ये Unisoc T606 SoC चिपसेट, 4GB RAM आणि 128GB स्टोरेज ऑफर केलं जात आहे. हा फोन 4 जीबी वर्चुअल रॅमला सपोर्ट करतो. Lava Bold N1 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरीसह 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देखील देण्यात आला आहे.