Samsung घेऊन आलाय ब्लॉकबस्टर 'फॅब ग्रॅब फेस्ट' सेल! गॅजेट्स व अप्लायन्सेसवर मिळवा भरघोस सूट, खरेदीची संधी चुकवू नका
भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंग ने त्यांच्या ग्राहकांसाठी ब्लॉकबस्टर सेल ‘फॅब ग्रॅब फेस्ट’ ची घोषणा केली आहे. १ मे रोजी सुरू झालेला हा बहुप्रतिक्षित शॉपिंग महोत्सव सॅमसंगच्या अत्याधुनिक उत्पादनांच्या व्यापक श्रेणीवर धमाकेदार, लिमिटेड-टाइम डिल्स उपलब्ध आहेत. ही उत्पादने फक्त Samsung.com, सॅमसंग शॉप अॅप आणि सॅमसंग एक्सक्लुसिव्ह स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत.
ग्राहक सॅमसंग गॅलॅक्सी एस, गॅलॅक्सी झेड आणि गॅलॅक्सी ए स्मार्टफोन सिरीजच्या निवडक मॉडेल्सवर जवळपास ४१ टक्के मिळवू शकतात. तसेच, निवडक गॅलॅक्सी टॅब्लेट्स, अॅक्सेसरीज आणि वेअरेबल्स जवळपास ५० टक्क्यांच्या सूटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही सॅमसंगप्रेमी असाल आणि तुम्हाला सॅमसंगचं कोणतंही नवं गॅझेट खरेदी करण्याची इच्छा असेल तर हा सेल बेस्ट आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कारण इथे तुम्हाला शॉपिंगसह बचत करण्याची देखील संधी मिळणार आहे. वापरकर्ते निवडक गॅलॅक्सी बुक५ व बुक४ लॅपटॉप्सवर जवळपास ३५ टक्के सूटचा आनंद घेऊ शकतात. नवीन गॅलॅक्सी टॅब एस१० एफई खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २९९९ रूपये किमतीचा केबलशिवाय ४५ वॅट चार्जर मोफत मिळेल. सेलमध्ये केवळ डिस्काऊंट ऑफर केलं जात नाही तर ग्राहकांच्या फायद्याला देखील प्राधान्य दिलं जात आहे.
यावेळी सॅमसंगच्या फ्लॅगशिप टेलिव्हिजन्सवर देखील अद्वितीय डिल्स ऑफर कल्या जात आहेत. ग्राहक निओ-क्यूएलईडी ८के, निओ क्यूएलईडी, ओएलईडी, क्यूएलईडी, द फ्रेम आणि क्रिस्टल ४के यूएचडी सिरीज या मॉडेल्सवर जवळपास ४८ टक्के सूट मिळवू शकतात. तसेच, ग्राहक निवडक टेलिव्हिजन्सच्या खरेदीवर जवळपास ५००० रूपयांच्या एक्स्चेंज बोनसचा फायदा घेऊ शकतात.
सॅमसंगच्या डिजिटल अप्लायन्सेसच्या संपूर्ण श्रेणीवर विशेष ऑफर्स उपलब्ध आहेत. रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, मायक्रोवेव्ह्ज, एअर कंडिशनर्स आणि मॉनिटर्सवर वेगवेगळ्या डिल्स ऑफर केल्या जात आहेत. साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर्स आणि फ्रेंच-डोअर रेफ्रिजरेटर्सच्या निवडक मॉडेल्सवर जवळपास ४३ टक्के सूट दिली जात आहे.
वॉशिंग मशिन्सचे निवडक मॉडेल्स जवळपास ४३ टक्क्यांच्या सूटसह उपलब्ध असतील. निवडक विंडफ्री एसी मॉडेल्स ५८ टक्के सूटच्या सर्वोत्तम डिलसह खरेदी करता येऊ शकतात, तसेच दोन किंवा अधिक युनिट्सच्या खरेदीवर अतिरिक्त ५ टक्के सूट दिली जात आहे. या एसींमधील पीसीबी पोर्टवर ५ वर्षांची वॉरंटी आणि कॉम्प्रेसरवर १० वर्षांची वॉरंटी आहे.
Samsung.com किंवा सॅमसंग शॉप अॅपच्या माध्यमातून दोन किंवा अधिक स्मार्ट होम अप्लायन्सेसची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ५ टक्क्यांची अतिरिक्त सूट मिळेल. निवडक सॅमसंग मॉनिटर्स जवळपास ६० टक्क्यांच्या सूटसह उपलब्ध असतील. तसेच, सॅमसंग गेमिंग मॉनिटर्सवर जवळपास ७००० रूपयांची त्वरित कार्ट सूट देत आहे.