Meta ने उचललं मोठं पाऊल! पालक मुलांच्या अकाऊंटवर ठेऊ शकतात नजर, पॅरेंटल कंट्रोल्समध्ये होणार हे महत्त्वाचे बदल
सोशल मीडिया कंपनी Meta ने त्यांच्या तरूण युजर्सच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांच्या प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन पॅरेंटल कंट्रोल फीचर्स सादर केलं आहे. कंपनीने सादर केलेल्या या नवीन फीचरअंतर्गत आता पालक त्यांच्या मुलांच्या अकाऊंटवर नजर ठेऊ शकणार आहेत. पालक आता AI चॅटबॉट्स वापरून मुलांचे खाजगी चॅट्स बंद करू शकणार आहेत. हा निर्णय अशावेळी घेण्यात आला आहे की, जेव्हा कंपनीवर मुलांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
Meta ने घोषणा केली आहे की, आगामी वर्षाच्या सुरुवातीला पालकांना हा पर्याय पाहायला मिळणार आहे. पालकांना त्यांच्या मुलांचे AI कॅरेक्टरसह एक-एक चॅट बंद करण्याचा पर्याय मिळणार आहे. तथापी, Meta चे AI असिस्टेंट पूर्णपणे बंद केला जाऊ शकणार नाही. कंपनीचे असे म्हणणं आहे की, हे असिस्टेंट केवळ शैक्षणिक आणि उपयोगी माहिती प्रदान करणार आहे. यामध्ये युजर्सच्या वयानुसार सुरक्षा फिल्टर्स आधीपासूनच उपलब्ध असणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
Meta ने सांगितलं आहे की Instagram वर टीन अकाउंट्ससाठी आता PG-13 लेवलचा कंटेंट डिफॉल्ट रूपद्वारे सिमित असणार आहे. याचा अर्थ असा की किशोरवयीन यूजर्स आता फक्त PG-13 चित्रपटासारखे फोटो आणि व्हिडिओ पाहू शकतील, ज्यामध्ये नग्नता, ड्रग्जचा वापर किंवा धोकादायक स्टंट सारख्या कंटेंटचा समावेश नसेल. शिवाय, पालकांच्या परवानगीशिवाय मुले या सेटिंग्ज बदलू शकणार नाहीत. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे आता किशोरवयीन युजर्सची सुरक्षा टिकून राहणार आहे.
जर पालकांना चॅट्स बंद करायचे नसतील तर ते एखाद्या खास चॅटबोटला ब्लॉक करण्याचा पर्याय देखील निवडू शकणार आहेत. यासोबतच, आता पालकांना अशी माहिती देखील दिली जाणार आहे की, त्यांची मुलं AI कॅरेक्टर्ससोबत कोणत्या विषयावर संवाद साधत आहेत. तथापी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांना सर्व चॅट्सचा एक्सेस दिला जाणार नाही.
Common Sense Media च्या अलिकडच्या अहवालात असे दिसून आले आहे की जवळजवळ 70 टक्के किशोरवयीन मुले AI चॅटबॉट्स वापरतात आणि त्यापैकी निम्मे नियमितपणे त्याचा वापर करत आहेत. मेटाचे नवीन पीजी-13 नियम आता या AI चॅट्सना देखील लागू होतील. तथापि, मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेशी संबंधित काही संस्थांनी या उपाययोजनांबद्दल शंका व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की मेटाने सुरक्षा वाढवण्यासाठी प्रयत्न केले असले तरी, एआय चॅट्स आणि मुलांच्या गोपनीयतेच्या परिणामाबद्दल अनेक प्रश्न अजूनही आहेत.